कोरोना संशयित व्यक्तीचा पत्ता चुकला, रात्रभर पायपीट करून वाचा कसा लागला शोध

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या पत्ताचा धोळ अखेर संपला. बिर्ला कॉलनी, जठारपेठ अशा पत्यामुळे उडालेला गोंधळ अखेर जठारपेठ रेल्वे क्वॉटरमध्ये जाऊन थांबला. एका आरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने आता रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीची वातावरण आहे.

अकोला ः कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या पत्ताचा धोळ अखेर संपला. बिर्ला कॉलनी, जठारपेठ अशा पत्यामुळे उडालेला गोंधळ अखेर जठारपेठ रेल्वे क्वॉटरमध्ये जाऊन थांबला. एका आरपीएफ जवानाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने आता रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीची वातावरण आहे.

चुकीचा पत्ता दिल्यामुळे महानगरपालिका यंत्रणेला रात्रभर पायपीट करायला लावणारा रुग्ण अखेर जठारपेठ परिसरातीलच रेल्वे क्वॉटरमधील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बिर्ला कॉलनीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोरोना बाधित रुग्ण आरपीएफ जवान असल्याची माहिती आहे. आतापर्यंत रेल्वेची केवळ मालवाहतूनक सेवाच सुरू होती. आता विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. त्यातून कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविले जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील वरदळ वाढली आहे. परिणामी रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आता कोरोना विषाणूची बाधा होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच आरपीएफ जवानाला कोरोना झाल्याच्या अहवाल मिळाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना संसर्ग सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे कर्मचारी धास्तावले आहे.

रात्रभर घेतला होता शोध
नाव आणि पत्ता यातील गोंधळामुळे जठारपेठ परिसरातील कोरोना बाधित रुग्णाचा शोध घेण्यासाठी नगरसेवक व मनपा कर्मचाऱ्यांना रात्रभर पायपीट करावी लागली होती. अखेर रविवारी रात्री उशिरा रुग्णाचा शोध लागल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात
कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाचा जठारपेठ रेल्वे क्वॉटरमध्ये शोध लागल्यानंतर त्याला मनपा कर्मचारी व आरोग्य विभागाने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Corona misses the suspect's address, searching all night to see what went wrong