मृत पॉझिटिव्ह रुग्णांच्या मुलीलाही कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

एकीकडे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे दुपार तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह येत असताना दुसरीकडे मात्र पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबियांचे रिपोर्ट मात्र पॉझिटिव येत असल्याची स्थिती आहे

 

अकोला : एकीकडे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे दुपार तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह येत असताना दुसरीकडे मात्र पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबियांचे रिपोर्ट मात्र पॉझिटिव येत असल्याची स्थिती आहे

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता त्याच्या कुटुंबातील सतरा वर्ष मुलीचा शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात पॉझिटिव्ह व्हाल आला असल्याने आता अकोल्यात तीन वर्ष बालकासह या सतरा वर्षीय मुलीचा पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून समावेश झाला आहे .

शनिवारी (ता.18 ) सकाळी  प्राप्त अहवालानुसार, 55 अहवाल आज प्राप्त झाले. त्यामध्ये एका जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून 54 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्ण ही १७ वर्षीय मुलगी असून 13  एप्रिल रोजी मयत झालेल्या पॉझिटीव्ह रुग्णाची मुलगी आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यात दोन पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात एकूण 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते त्यापैकी एका जणाने आत्महत्या केली होती तर दुसऱ्याचा मृत्यू झाला होता उर्वरित बारा रुग्णांपैकी अकरा जणांचे दुबार तपासणीचे  रिपोर्ट निगेटिव आले होते तर एका तीन वर्ष चिमुकल्याचा दुबार तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव आला होता अशातच आज पुन्हा एका 17 वर्षीय मुलीचा प्राथमिक तपासणी  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे असे जरी असले तरी ज्या 11 रुग्णांचा दुबार तपासणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे त्त्यांच्या कोरोना तपासणीचे अद्यापही काही अहवाल येणे असल्याने त्यांना कोरोना मुक्त समजणे चुकीचे ठरणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona obstruction to daughter of deceased positive patient

Tags
टॉपिकस
Topic Tags: