पॉझिटिव्ह रुग्णाने गळ्यावर मारले ब्लेड, अडीच तासातच झाला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान उघडकीस आला. मात्र, अडीच तासातच त्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा जिल्हा प्रशानने दुजोरा दिला आहे.  

 

अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी नऊ वाजता दरम्यान उघडकीस आला. मात्र, अडीच तासातच त्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा जिल्हा प्रशानने दुजोरा दिला आहे.  

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील  आयसोलेशन कक्षात सध्या एकूण 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत होता. यामध्ये अकोल्यातील सहा तर पातूर मधील सात रुग्णांचा समावेश आहे या पातूरमधील सात रुग्णांपैकी एकाने शनिवारी सकाळी गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालय स्टाफच्या लक्षात येताच त्याचेवर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.१०) आलेल्या अहवालात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत, असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona patient death