'तो' दुसऱ्या अहवालातही निगेटीव्ह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

तालुक्यात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल रूग्णाचा दुसरा तपासणी अहवाल निगेटीव्ह असून त्याला होम क्वोरोंटाईन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेंद्र नेमाडे यांनी दिली.

 

मूर्तिजापूर (जि.अकोला):  तालुक्यात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल रूग्णाचा दुसरा तपासणी अहवाल निगेटीव्ह असून त्याला होम क्वोरोंटाईन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेंद्र नेमाडे यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष उभारण्यात आलेला आहे. भविष्यातील संभाव्य स्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन अपवादात्मक परिस्थितीत विलगीकरण कक्ष म्हणून वापर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर येथून पाच किमी अंतरावर असणाऱ्या  शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतीगृहाच्या ९० खोल्या सुद्धा उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या पुढाकारातून आरक्षित करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्यामुळे सदर अद्ययावत वसतीगृह रीक्त आहे, त्याचा विलगीकरण कक्ष म्हणून गरज पडल्यास वापर केला जाईल.
 

येथील  एक प्रवासी इसम अकोल्याच्या विलगीकरण कक्षात होता. त्याचा पहिला कोरोना बाधा अहवाल निगेटीव्ह होता, मात्र तो प्रवास करून आलेल्यांच्या यादीत समाविष्ट असल्याने विलगीकरण कक्षात होता. त्याचा दुसरा तपासणी अहवाल प्राप्त झाला. तो निगेटीव्ह असल्यामुळे होम क्वारंटाउनचा सल्ला देऊन त्याला घरी पाठविण्यात आले. दरम्यान शहरात महसुल, पालिका व पोलीस प्रशासनाने चोख नियंत्रण ठेवले असून लॉकडाऊन दरम्यान गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग राखून शक्यतो घरातच राहाण्याचे आवाहन नागरिकांना प्रशासनाने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona patient negative