अकोला येथे आणखी एक कोरोना पॉझिटीव्ह, दुसरा रुग्ण अकोटफैलातील

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

काही दिवसापूर्वी एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नसलेल्या अकोला शहरात दोन दिवसांत दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहे. मंगळवारी बैदपुरा परिसरात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळलल्यानंतर आता बुधवारी (ता.८) अकोटफैल परिसरातील दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने अकोलेकरांच्या ह्दयाचे ठोके वाढले आहेत.

 

 

अकोला : काही दिवसापूर्वी एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नसलेल्या अकोला शहरात दोन दिवसांत दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहे. मंगळवारी बैदपुरा परिसरात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळलल्यानंतर आता बुधवारी (ता.८) अकोटफैल परिसरातील दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने अकोलेकरांच्या ह्दयाचे ठोके वाढले आहेत. अशातच आता बैदपुरा परिसर सील केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अकोटफैल परिसरही सील करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.

 वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी १२३ अहवालापैकी ८५ अहवाल निगेटीव्ह तर १ अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तर ३७ अहवाल प्रलंबित होते. यातच बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अकोटफैल परिसरातील पुन्हा एक रुग्ण पॉझिटीव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे. तेव्हा आता अकोला शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दोनवर गेली असून, अद्याप किती अहवाल प्रलंबित आहेत याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona positive one more