अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची `साठी पार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

अगदी बोटावर मोजण्याइतकी रुग्ण संख्या असलेल्या अकोला शहरात आता पॉझिटिव्ह रूग्णांची वाटचाल हळूहळू शंभरीकडे होत आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या एकूण सहा अहवालपैकी सहाही अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता ही रुग्णसंख्या 63 वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 88 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 

अकोला : अगदी बोटावर मोजण्याइतकी रुग्ण संख्या असलेल्या अकोला शहरात आता पॉझिटिव्ह रूग्णांची वाटचाल हळूहळू शंभरीकडे होत आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या एकूण सहा अहवालपैकी सहाही अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता ही रुग्णसंख्या 63 वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 88 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 गुरूवार (ता.७) रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार सकाळी एकूण सहा अहवाल प्राप्त झाले. या सहा अहवालापैकी एकही अहवाल निगेटिव्ह आला नाही. सहाही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. अकोल्यात ठराविक परिसरात बाधित असलेला कोरोना आपले हातपाय पसरत असून रोज नवनवीन परिसरातील रुग्ण पॉझिटिव्ह म्हणून पुढे येत आहेत. ही अकोले करासाठी चिंतेची बाब नक्कीच आहे.

गुरुवारी  प्राप्त झालेल्या अहवाला पैकी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण राधाकिसन प्लॉट, उगवा, अकोट फ़ैल, बैदपुरा, माळीपूरा,खंगनपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक महिला स्त्री रुग्णालयातून संदर्भीत करण्यात आली आहे. ती ही अकोट फ़ैल येथील रहिवासी आहे.

कोरोना अपडेट

  • पॉझिटिव्ह अहवाल 88
  • उपचार सुरू असलेले 63
  • मृत्यू 10
  • आत्महत्या 1
  • बरे झालेले 14

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona positive patients are above 60