सलग तीन दिवसांपासून येताहेत संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

जिल्ह्यात मंगळवार (ता.14) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 43 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर 206 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून, जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह अहवाल संख्या 13 वर कायम आहे. त्यातील एका रुग्णाने आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात 12 पॉझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत.

 

अकोला :  जिल्ह्यात मंगळवार (ता.14) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 43 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर 206 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून, जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह अहवाल संख्या 13 वर कायम आहे. त्यातील एका रुग्णाने आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात 12 पॉझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी दिवसभरात (गेल्या 24 तासांत) 10 जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत 296 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 219 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 206 निगेटिव्ह आहेत. तर 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली.

दरम्यान जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या प्रवाश्यांची संख्या 349 असून, त्यातील 68 जण गृह अलगीकरणात तर 95 जण संस्थागत अलगीकरणात आहेत. 33 जण विलगीकरणात आहेत. अद्याप 152 जणांचे अलगीकरणाचे 14 दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप 77 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाली आहे.

अशी आहे आजची स्थिती
तपासणीसाठी पाठविलेले नमुने-296
प्राप्त अहवाल- 219
पॉझीटिव्ह-12
निगेटीव्ह-206
प्रलंबित-77


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona report negative

Tags
टॉपिकस
Topic Tags: