दिलासादायक: आठ जणांचे दुबार तपासणीचे अहवाल निगेटीव्ह

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

अकोल्यात बारापैकी आठ पॉझिटिव रुग्णांचे दुसऱ्या टप्प्यातील अहवाल निगेटिव्ह आल्याने गुरुवार अ  अकोलेकरांसाठी खऱ्या अर्थाने पॉझिटिव ठरला आहे.

 

अकोला : अकोल्यात बारापैकी आठ पॉझिटिव रुग्णांचे दुसऱ्या टप्प्यातील अहवाल निगेटिव्ह आल्याने गुरुवार अ  अकोलेकरांसाठी खऱ्या अर्थाने पॉझिटिव ठरला आहे.

आज गुरुवारी (ता.१६ ) रोजी  सकाळी  प्राप्त अहवालानुसार आज नव्याने 45 नवे  रुग्ण दाखल झाले. तर आज प्राप्त 33 अहवाल प्राप्त झाले. आजपर्यंत प्राप्त तपासणी अहवाल २८५ पाठविले होते.पैकी २३८ निगेटीव्ह होते तर पॉझिटीव्हची संख्या १४ (पैकी दोघे मयत झाल्याने आता शिल्लक १२ रुग्ण) आहेत. यातच अप्राप्त अहवाल- २४ असून गुरुवारी प्राप्त अहवालात आठ पॉझिटीव्ह रुग्णांच्या दुबार तपासणीच्या अहवालाचाही समावेश असून ते सर्व निगेटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे ह्यात अकोल्यातील बैदपूरा भागातील पहिल्या रुग्णाचाही समावेश आहे.अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona report negative

Tags
टॉपिकस
Topic Tags: