esakal | ‘लॉकडाऊन’च्या गर्तेत अडकली कोरोना विषाणू चाचणी लॅब !
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona virus test lab stuck in 'lockdown' pit!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य सरकाने राज्यात औरंगाबाद, धुळे, सोलापूर, नागपूर जीएमसी, मीरज आणि अकोला या सहा ठिकाणी नव्याने ‘व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोसीस लॅब’ला मान्यता दिली होती.

‘लॉकडाऊन’च्या गर्तेत अडकली कोरोना विषाणू चाचणी लॅब !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीएमसीमध्ये कोरोना विषाणू चाचणी लॅब उभारणीच्या कामाला वेग आला असला तरी, लॉकडाऊनमुळे लॅबसाठी आवश्यक उपकरणे, रसायने आणि उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. भरीस भर नागपूर येथील दोन मशीनपैकी एका मशीनमध्ये बिघाड झाल्याने ती बंद पडली आहे. यामुळे रूग्णांच्या ‘स्वॅब’ तपासणीच्या वैद्यकीय अहवालाकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य सरकाने राज्यात औरंगाबाद, धुळे, सोलापूर, नागपूर जीएमसी, मीरज आणि अकोला या सहा ठिकाणी नव्याने ‘व्हायरल रिसर्च अॅन्ड डायग्नोसीस लॅब’ला मान्यता दिली होती. लॅब उभारणीचे कामही वेगाने करण्यात आले. आठवड्याभरातच यातील औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरीत तिन्ही ठिकाणी लॉकडाऊनचा फटका बसला आहे. लॅबसाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, ३० ते ३५ प्रकारची रसायने पुरविण्यासाठी पुरवठादार उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवाय, लॉकडाऊनमुळे वाहतुकीचीही मोठी अडचणी असल्याचे बोलल्या जात आहे. वेळेत पुरवठादार न मिळाल्यास तिन्ही ठिकाणी लॅबची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरच मिळणार ‘टेस्टींग’ची परवानगी!
वैद्यकीय उपकरणे व रसायने उपलब्ध झाल्यानंतर जिएससीसह मीरज आणि नागपूर जीएमसीला ‘आयसीएमआर’कडे तयारीची मागणी करावी लागणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) कीटची मागणी करावी लागले. या कीटच्या आधारे कोरोनाच्या संशयित रुग्णाचे नमुने तपासून त्याचा अहवाल ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात येईल. या परीक्षेत पास झाल्यावर ‘एनआयव्ही’ टेस्टींसाठी तिन्ही लॅबला परवानगी देईल.

तर लवकर मिळतील रिपोर्ट
सर्वोपचारच्या आयसोलेशनमधून पाठवण्यात येणाऱ्या नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर नागपुरातील एकाच विषाणू विषयक संशोधन करणाऱ्या प्रयोग शाळेवर विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथून येणाऱ्या ‘स्वॅब’नमुन्यांचा भार वाढत आहे. परिणामी अहवाल मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे जीएमसीतील प्रयोगशाळा लवकर सुरू झाल्यास रुग्णांचे वैद्यकीय अहवाल मिळणे सोयीचे होईल.

डेडलाईनलाच मिळते पुन्हा डेडलाईन
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कोरोना विषाणू चाचणी लॅब सुरू तत्काळ कार्यान्वीत करा असे आदेश आधी पालकमंत्री बच्चू कडू यांनी आढावा बैठकीत दिले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनीसुद्धा आढावा घेऊन ७ एप्रिलपर्यंत ही लॅब सुरू करण्यात यावी ही डेडलाईन दिली होती. मात्र, या डेडलाईनला पुन्हा डेडलाईन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लॅबचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी या लॅबमधील अती महत्वाचे साहित्य बसविले जाणार आहे. तर हे साहित्य बसविल्यानंतर पहिली टेस्ट करून करून ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात येईल या प्रक्रिया दोन ते तीन दिवस लागणार, तरी या आठवड्यात ही लॅब कार्यान्वीत केली जाणार.
-डॉ. अपूर्व पावडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.

loading image