गाव खेड्यांकडे वाढली कोरोनाची वाटचाल, अंत्री मलकापूर अंतर उगवा गावात आढळला कोणाचा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर नंतर आता अकोला तालुक्यातील उगवा येथे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून गाव खेड्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

 

अकोला : बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर नंतर आता अकोला तालुक्यातील उगवा येथे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून गाव खेड्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. मागील महिन्यात स्थिरावलेल्या कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या आता अचानक वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यामधील अंत्री मलकापूर येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह वाढल्यानंतर गुरुवारी (ता. ७) अकोला तालुक्यातील उगवा येथे सुद्धा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

जिल्यात परतलेल्या ३१३ प्रवाशांची वैद्यकीय तपासणी
कोरोना विषाणू संसर्गाचा भीतीमुळे पुणे, मुंबई, नागपूरसह इतर जिल्ह्यातून व परप्रांतातून प्रवासी जील्याता परत येत आहेत. संबंधित नागरिक शिक्षणासह उदरनिर्वाह किंवा नोकरीसाठी इतर जिल्ह्यात गेले होते. परंतु ज्या ठिकाणाहून ते परत येत आहेत त्याठिकाणी कोरोना विषाणूने अनेक नागरिकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात परतलेल्या अशा ३१३ नागरिकांची जिल्हा परिषदेच्या ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकाही व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला नाही. अकोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २२, अकोट ११, बाळापुर १३, बार्शीटाकळी ६६, पातूर १११ व मुर्तीजापुर ९० अशाप्रकारे ३१३ प्रवाशांची प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola corona's journey increased from village to village, antri malkapur got one patient