वादळी पाऊस, गारांनी झोडपले अन् केळी, पपई, लिंबू, संत्री गारद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

वादळी पाऊस व गारपीटीमुळे रविवारी (ता.10) अकोट तालुक्यातील एक हजार 695 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात केळी 575 हेक्टर, संत्रा बाग 850 हेक्टर, लिंबू 95 हेक्टर, कांदा 75 हेक्टर, उन्हाळी भुईमुग 80 हेक्टर, भाजीपाला 20 हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

 

अकोला : वादळी पाऊस व गारपीटीमुळे रविवारी (ता.10) अकोट तालुक्यातील एक हजार 695 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात केळी 575 हेक्टर, संत्रा बाग 850 हेक्टर, लिंबू 95 हेक्टर, कांदा 75 हेक्टर, उन्हाळी भुईमुग 80 हेक्टर, भाजीपाला 20 हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळी पावसाने अकोट तालुक्यातील 18 गावांमध्ये पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक हजेरी लावलेल्या या वादळी पावसाचा 1700 हेक्टरवरील केळी, पपई, लिंबूवर्गीय पिकांसह भाजीपाला शेतीला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टी व अवकाळीच्या तडाख्यात खरीप तसेच रब्बी सुद्धा उद्‍ध्वस्त झाला. हाती आलेले कापसाचे व तुरीचे पीक शासकीय खरेदी केंद्र बंद राहाल्याने, अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या घरात पडून खराब होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सध्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये शेती व्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला आहे. भाजीपाला व फळपीक उत्पादनातून शेतकरी कसाबसा सावरण्याचा व ढासळलेली आर्थिक बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वातावरणात अचानक बदल होऊन रविवारी (ता.10) विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावून, अकोट तालुक्यात 18 ते 20 गावात फळपिकांसह भाजीपाला शेतीचे मोठे नुकसान केले.

येथे बसला वादळी पावसाचा फटका
नुकसानग्रस्त गावात अकोलखेड मंडळ मधील अकोलखेड, आंबोडा, मोहाला, धारुळ रामापूर, सुकली, राहणापुर, शहानूर, मलकापूर, पोपटखेड, आमोणा, केलपाणी, गुल्ललघाट, सोमठाणा, कोहा, कुंड, बोरी इत्यादी 18 गावांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola damage to banana, papaya, lemon and orange crops due to hail