अकोल्यात पुन्हा एका पॉझिटिव रुग्णांची भर, रुग्णसंख्या जाऊन पोहचली आठवर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

शहरात रविवारी प्राप्त झालेल्या बारा अहवालापैकी 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एकाचा अहवाल हा पॉझिटिव आला आहे.

 

अकोला: मागील सहा दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण न आढळलेल्या अकोला शहरात रविवारी प्राप्त झालेल्या बारा अहवालापैकी 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एकाचा अहवाल हा पॉझिटिव आला आहे.

पॉझिटिव्ह असलेला रुग्ण सिंधी कॅम्पमधील असून हा परिसर प्रशासनाने सील केला आहे. रविवारी (ता.२६ ) सकाळी प्राप्त अहवालानुसार तपासणीसाठी एकूण बारा अहवाल पाठवण्यात आले होते. त्यापैकी 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एकजणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आता. अकोल्याच्या रुग्ण संख्येत एकाने भर पडली असून रुग्णसंख्या आठ एवढी झाली आहे.

हेही वाचा - नशेसाठी सॅनीटायझरचा एक घोट ठरू शकतो घातक

एवढे असतानाही यात आनंदाची बाब म्हणजे बैदपुरा येथील पहिल्या रुग्णाचा पाचवा व सहावा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज आढळलेला पॉझिटिव्ह रुग्ण हा ४१ वर्षीय पुरुष असून तो सिंधी कॅम्प मधील रहिवासी आहे.तर विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधी कॅम्प मध्ये आढळलेल्या या पॉझिटिव्ह रुग्णाचे सिव्हील लाईन्स पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जीएमडी मार्केटमध्ये ड्रायफ्रुट्स विक्रीचे दुकान होते त्यामुळे हे जीएमडी मार्केटही सील करण्याची प्रक्रिया सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सुरू केली आहे. तर आता या दुकानात कोण आले होते त्यांची तपासणी केली जात आहे. या सगळ्यांना प्रशासन ताब्यात घेऊन तपासणी करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola direct another one corona positive, total number of positive are eight