चोहीबाजूने दाटलाय अंधार, अकोलेकर सावधान!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

बुलडाणा, वाशीमनंतर आता अमरावतीमध्येही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळत आहेत. बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांच्या संपर्कात काही लोक आल्याने, त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणखी इतरांच्याही संपर्कात आले असून, ही एक मोठी साखळी निर्माण होऊ शकते.

 

अकोला : कोरोनामुळे बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर वाशीम जिल्ह्यातही कोरोना बाधित रूग्ण सापडला आहे. दिवसेंदिवस या तिन्ही जिल्ह्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. असे असले तरी जिल्ह्यात आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात असून, एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही. मात्र, मेडशी येथील बाधित रूग्णाच्या संपर्कात पातूर, खेट्री येथील १३ व्यक्ती आल्याने एकच खबळब उडाली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात समुह संक्रमणाचा मोठा धोका असल्याची चर्चा वैद्यकीय वतुर्ळात सुरू असून, नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

बुलडाणा, वाशीमनंतर आता अमरावतीमध्येही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळत आहेत. बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांच्या संपर्कात काही लोक आल्याने, त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणखी इतरांच्याही संपर्कात आले असून, ही एक मोठी साखळी निर्माण होऊ शकते. तसेच मरकज येथून आलेल्या नागरिकांचाही आरोग्य प्रशासन शोध घेत असून त्यांच्या कोरोना तपासण्या करण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या चारही बाजूंनी कोरोनाबाधित रूग्ण असतांना अकालेकरांना सावधान होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण नसलेल्या अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या समुह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.

स्वयंशिस्त पाळण्याची गरज
कोरोनाचा धोका वाढत असला, तरी शहरात अनेक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे वास्तव आहे. बँकाबाहेर, भाजी बाजारात खरेदी, मेडिकल, धान्य व खाद्य वाटपाकरिता केलेली गर्दी यासह सर्वच ठिकाणी नागरिक शिस्तभंग करताना दिसून येतात. हा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असून, स्वयंशिस्त पाळणे आवश्यक झाले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण
सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णासोबत डॉक्टर व परिचारीकांचा संपर्क येतो. मात्र, यातील कोणता व्यक्ती कोरोना बाधित आहे, याचा अंदाज लावणे कठीणच आहे. अशातच येथील डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा संसाधने मिळाली नसल्याने डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांना सुरक्षा संसाधने देण्याची मागणी होत आहे.

यावर द्या लक्ष

  • मास्कचा वापर करा
  • वारंवार हात धुवा
  • नाका, तोंडाला हात लावणे टाळा
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
  • क जीवनसत्व अन्नाचे सेवन करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola District group at risk of infection