कंचनपुरात आढळले चाळीस तीव्र जोखीम संपर्काचे नागरिक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 May 2020

अकोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आगर अंतर्गत कंचनपुर येथे कोरोना विषाणू संसर्गाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सदर गावात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे . सर्वेक्षणासाठी गठित आठ पथकांनी रविवारी (ता. १०) गावातील २०६ घरांना भेटी देऊन १०२७ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.

 

अकोला  : अकोला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आगर अंतर्गत कंचनपुर येथे कोरोना विषाणू संसर्गाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सदर गावात आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे . सर्वेक्षणासाठी गठित आठ पथकांनी रविवारी (ता. १०) गावातील २०६ घरांना भेटी देऊन १०२७ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.

जगभर थैमान माजवणाऱ्या कोरोना विषाणूने भारतात सुद्धा जोर पकडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात सुद्धा कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांनी दीडशेचा आकडा गाठला आहे. शहरापर्यंत मर्यादीत असलेल्या सदर विषाणूने आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे सुद्धा वळवला आहे.

बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर नंतर अकोला तालुक्यातील उगवा व आता कंचनपूरमध्ये सुद्धा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सदरा गावाचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या आठ पथकांमार्फत करण्यात आले. यावेळी ४० नागरिक तीव्र जोकिंग संपर्काचे तर ४३ नागरिक कमी जोखमीचे आढळून आले. तीव्र जोखमीचे नागरिकांना १०८ रुग्णवाहिकाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भित करण्यात आले आहे. तर कमी जोखमीचे ४३ नागरिकांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावामध्ये बाहेरगावावरून व इतर राज्यातून आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्याबाबत तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी केले आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Forty high-risk contact citizens found in Kanchanpur