धोका वाढला, दीड वर्षांच्या बालकासह आणखी चार जण पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

अकोला कोरोनाचे नवे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच मंगळवारी प्राप्त झालेल्या एकूण 50 अहवालापैकी चार अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यात एक दीड वर्षीय बालकाचा समावेश आहे.

 

अकोला  : अकोला कोरोनाचे नवे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच मंगळवारी प्राप्त झालेल्या एकूण 50 अहवालापैकी चार अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यात एक दीड वर्षीय बालकाचा समावेश आहे.

मंगळवारी प्राप्त झालेल्या पन्नास अहवालामध्ये 46 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत, तर चार अहवाल पॉझिटिव्ह आहेत. एकूणच ही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून, आरोग्य यंत्रणेवरील ताण दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे. याचा परिणाम येणाऱ्या काळात रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारावर नक्कीच होणार यात शंका नाही. मात्र, वयोवृद्ध रुग्णांसोबतच आता बालकांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
  
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक दीड वर्षाचा बालक, एक आठ वर्षाचा मुलगा, एक ६२ वर्षीय इसम तर एक २३ वर्षीय महिला असून हे सर्व जण भवानी पेठ तारफ़ैल या भागातील रहिवासी आहे.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१६३
मयत-१४(१३+१),डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola four corona positive, including a one-and-a-half-year-old child