रेल्वे तिकिटांचे पैसे मिळणार परत, बघा ही आहे तारीख

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 26 May 2020

रेल्वेच्या सर्व विभागांमार्फत लॉकडाउन काळात रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षित तिकिटांचे पैस प्रवाशांना परत करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार उद्यापासून भुसावळ रेल्वे विभागासह राज्यातील सर्व विभागात पंधरा-पंधरा दिवसांच्या टप्प्यातीत तिकिटाचे पैस परत करण्यास आजपासून (ता.26) सुरुवात होत आहे.

 

अकोला  : रेल्वेच्या सर्व विभागांमार्फत लॉकडाउन काळात रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षित तिकिटांचे पैस प्रवाशांना परत करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार उद्यापासून भुसावळ रेल्वे विभागासह राज्यातील सर्व विभागात पंधरा-पंधरा दिवसांच्या टप्प्यातीत तिकिटाचे पैस परत करण्यास आजपासून (ता.26) सुरुवात होत आहे.

कोरोना विषाणूमुळे 22 मार्चपासून देशभर लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. 30 जूनपर्यंत रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षित तिकिटाचे पैस परत करण्याचा निर्णय रेल्वेने आधीच जाहीर केला होता. त्यानुसार आता त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑनलाइन तिकिट आरक्षित करणाऱ्यांना त्यांचे पैसे ऑनलाइन परत केले जाणार आहे. मात्र रेल्वे स्थानकावर जाऊन तिकिट खिडकीवर तिकिट आरक्षित करणाऱ्यांना रेल्वे काऊंटरवरच पैसे परत करण्याची व्यवस्था केली आहे.त्याची सुरुवात 26 मेपासून करण्यात येत आहे.

असे असेल वेळापत्रक
तिकिट  आरक्षणाची तारीख रिफंडची तारीख
22 ते 31 मार्च 26 मेपासून
1 ते 14  एप्रिल 1 जूनपासून
15 ते 30  एप्रिल 7 जूनपासून
1 ते 15 मे  14 जूनपासून
16 ते 30 मे 21 जूनपासून
1 ते 30 जून 28 जूनपासून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Get your train ticket refunded, see this is the date