esakal | श्रेयाचं कौतुक करावं तेव्हढं कमीच, वाढदिवसाचा संकल्प ठरला कौतुकास्पद
sakal

बोलून बातमी शोधा

akola girl decide to donate cm relief fund on her birthday

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे. देशावर मोठं संकट असलं तरी अकोला येथील अकरा वर्षाच्या चिमुकलीने मुख्यमंत्री सहायता निधीला केलेली मदत त्याहूनही मोठी वाटते. खरंच चिमुकलीच्या या संवेदनशीलतेबद्दल करावं तेव्हढं कौतुक कमीच आहे.

श्रेयाचं कौतुक करावं तेव्हढं कमीच, वाढदिवसाचा संकल्प ठरला कौतुकास्पद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. आता वाढत्या वयाबरोबर त्याचं अप्रूप कमी होत जातं. ती गोष्ट वेगळी आहे. खरंतर वाढदिवस हा आपल्य जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती ही तिचं भाग्य घेऊन पृथ्वीतलावर येत असते. त्यामुळे मिळालेले आयुष्य हे प्रत्येकाने समाधानाने जगणे फार महत्वाचे आहे. हा दिवस आहे जल्लोषाचा आणि धन्यवाद देण्याचा. मग ते आपल्या परिवराबरोबर सेलिब्रेशन करणं असो वा त्या दिवशी एखादं चांगलं समाजकार्य करणं असो.

कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय ठप्प असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. देश असा कठीण काळात असताना बरेच मदतीचे हात समोर आले. मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये निश्चितच रतन टाटा आणि चित्रपटातील कलाकारांची किंवा काही संस्थांची नावे समोर आली असली तरी अकरा वर्षांच्या चिमुकलीने केलेली मदत प्रेरणादायी वाटते.

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे. देशावर मोठं संकट असलं तरी अकोला येथील अकरा वर्षाच्या चिमुकलीने मुख्यमंत्री सहायता निधीला केलेली मदत त्याहूनही मोठी वाटते. खरंच चिमुकलीच्या या संवेदनशीलतेबद्दल करावं तेव्हढं कौतुक कमीच आहे. 

बुधवार (ता.२२) हा श्रेयाचा वाढदिवसाचा दिवस. मात्र, सध्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून मदतीचे आवाहन केले असताना श्रेयानेही वाढदिवसाला खर्च होणारी अकरा हजार रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निश्चय केला.

अकोला येथील श्रेया लव्हाळे या अकरा वर्षांच्या चिमुकलीने वाढदिवसाला खर्च होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. चिमुकलीच्या या संवेदनशीलतेचे समाजातील विविध मान्यवरांकडून कौतुक होत आहे. श्रेया ही अकोल्यातील होलिक्रॉस शाळेची विद्यार्थिनी आहे. 

तिचे वडील अभियंता नितीन लव्हाळे यांनी हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपुर्द केला आहे. चिमुकलीच्या या संवेदनशीलतेबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.