कोरोनाविरुद्धच्या लढाईत योद्धा बनली अकोल्याची  कन्या

मनोज भिवगडे
Tuesday, 14 April 2020

आज कोरोना विषाणूमुळे अख्खे विश्व संकटाचा सामना करत आहे. भारतात दिवसागणिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात कोरोना संक्रमित आणि मृत्यू पावलेल्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये विषाणूमुळे हाहाकार माजविला आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांच्या जीवनासाठी अनेक आरोग्यदूत अहोरात्र लढा देत आहेत. या लढ्यामध्ये अकोल्यातील खुशबू सुनील हातेकर या तरुणीचाही प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अकोलावासीयांकरिता ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

 

अकोला : आज कोरोना विषाणूमुळे अख्खे विश्व संकटाचा सामना करत आहे. भारतात दिवसागणिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात कोरोना संक्रमित आणि मृत्यू पावलेल्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये विषाणूमुळे हाहाकार माजविला आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांच्या जीवनासाठी अनेक आरोग्यदूत अहोरात्र लढा देत आहेत. या लढ्यामध्ये अकोल्यातील खुशबू सुनील हातेकर या तरुणीचाही प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अकोलावासीयांकरिता ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नेरूळ, नवी मुंबई येथे एमडी मेडिसिन तृतीय वर्षाला असलेली खुशबू हातेकर ही 21मार्च 2020 ला तीन दिवसांच्या सुट्टीवर अकोला येथे आली होती. सरकारकडून कोरोनाला  हरविण्यासाठी सर्व  देशवासीयांना आवाहन करण्यात येत होते. वडिलांकडून जनसेवेचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाल्यामुळे खुशबूने सुट्टी न घेण्याचा विचार करून कोरोनाग्रस्तांना वाचविण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्धार केला. सुनील हातेकर व आईला स्पष्ट सांगितले की, मी स्वतःची काळजी घेईन; पण देशासाठी माझा कर्तव्यासाठी मी जाणारच. अशा परिस्थितीत मी घरात बसून राहिली तर कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. कुठल्याही परिस्थितीत रुग्णसेवा व देशबांधवांच्या सेवेची मी शपथ घेतली आहे. तिची  ही समर्पित भावना बघून सुनील हातेकर यांचेही डोळे पाणावले होते. मात्र मुलीच्या या निश्चयाने त्यांना मनोमन अभिमान व आनंदही वाटला. देशाच्या सेवेत एक निष्ठावान डॉक्टर आपण आपल्या परिवारातून दिला याचा त्यांना सार्थ अभिमान वाटला . 

सुनील हातेकर हे अकोल्यातील नामांकित नाव आहे. घरी सुखसमृद्धीची काहीही कमतरता नसताना केवळ देशसेवेसाठी खुशबूने मुंबईची वाट धरली. गोरगरिबांच्या सेवेसाठी मुंबई  गाठली . संचारबंदी व लॉकडाउनमुळे एक दिवसही थांबणे शक्य होते. त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांच्या सेवेसाठी झपाटलेली खुशबू 23 मार्चला अकोल्यावरून रेल्वेने निघून मुंबईत दाखल झाली.  आज खुशबू मुंबईमध्ये अनेक डॉक्टरांच्या सोबत कोरोनाला हरविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. डॉक्टरातील देवमाणूस असलेल्या आरोग्यदुतांच्या या लढ्यात आपणही आपले आशीर्वाद अकोल्याचा सन्मान वाढविणाऱ्या खुशबुच्या पाठीशी सदैव ठेवायला पाहिजेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola girl fight corona at mumbai