video : पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले चक्क पोलिसांचेच स्टींग ऑपरेशन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

तब्बल पन्नास दिवसांपासून पोलिस कडेकोट बंदोबस्तात आहेत. घर परिवार याची तमा न बाळगता अगदी कन्टेंन्मेंट झोनमध्ये आपली सेवा दिवसरात्र देत आहेत. मात्र, जिल्ह्यातील पालकमंत्री बच्चू कडू यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः स्टींग ऑपरेशन केले.

 

अकोला : राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात आज एक 'स्टींग ऑपरेशन' केलं. बैदपुरा भागातील कंटेन्मेंट झोनमध्ये आपली  ओळख लपवून जाण्याचा बच्चू कडू यांनी प्रयत्न केला. शहरातील फतेह चौकातून बच्चू कडू यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलीस शिपायांनी बच्चू कडू यांना आतमध्ये जाण्यास विरोध केला. अकोला जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या दोनशेकडे झपाट्याने वाढत चालली आहे. राज्याच्या तुलनेत मृत्यूचेही प्रमाण जास्त आहे. असे असले तरी तब्बल पन्नास दिवसांपासून पोलिस कडेकोट बंदोबस्तात आहेत. घर परिवार याची तमा न बाळगता अगदी कन्टेंन्मेंट झोनमध्ये आपली सेवा दिवसरात्र देत आहेत. मात्र, जिल्ह्यातील पालकमंत्री बच्चू कडू यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः स्टींग ऑपरेशन केले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकोल्यातील कमटेन्मेंट झोनमध्ये फिजिकल डिस्टसिंगचा बोजवारा उडाल्याचं चित्र गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्यात पहायला मिळत आहे.  या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी 'स्टींग ऑपरेशन' केलं. मात्र, सुदैवानं पालकमंत्र्यांच्या परिक्षेत अकोला पोलीस उत्तीर्ण झालेय. मात्र, पुढच्या काळात प्रतिबंधित क्षेत्रात संचारबंदीची आणखी कठोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी पोलीसांना दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Guardian Minister Bachchu Kadu conducted a police sting operation