Video:गुंडांची भर रस्त्यावरुन का काढली असावी मिरवणूक?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील यावलखेड, धोतर्डी, दहीगाव भागात अकोल्यातील गुंड प्रव्रूत्तीच्या युवकांनी चांगलाच उच्छाद मांडला होताय.. दरम्यान, पोलीस असल्याचं सांगत नागरिकांना मारहाण तसेच लुटमारीचे प्रकार हे गुंड प्रव्रूत्तीचे व्यक्तीं करीत असल्याचं यावेळी समोर आलं होतंय..

 

अकोला: शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील यावलखेड, धोतर्डी, दहीगाव भागात अकोल्यातील गुंड प्रव्रूत्तीच्या युवकांनी चांगलाच उच्छाद मांडला होताय.. दरम्यान, पोलीस असल्याचं सांगत नागरिकांना मारहाण तसेच लुटमारीचे प्रकार हे गुंड प्रव्रूत्तीचे व्यक्तीं करीत असल्याचं यावेळी समोर आलं होतंय..

त्यांनतर येथील नागरिकांनी या युवकांना पकडून चांगलाच चोप दिला होता.. आणि प्रकाराचा विडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.. तसेच या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांत गुन्हा दाखलहि केला होताय.. मात्र, तेव्हा पासून ते युवक फरार होते.  खंडणी मागणे असे अनेक प्रकार सर्रासपणे हे युवक करीत असल्याचे सांगण्यात येत आहेय.. या गुंडगिरीने पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान उभे राहले होते.  

 

दरम्यान, आज पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखानं यातील एका मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेय.. सध्या पकडण्यात आलेल्या युवकाची संपूर्ण शहरात एकच दहशत होतीय.. या दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलीसांनी शहातील प्रमुख मार्गावरून धिंड काढलीये.. शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या या पावलाचे सामान्य नागरिकांमधून स्वागत अर्थात कौतूक होत आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखाचे प्रमुख पोलीस निरीक्षक शैलष सपकाळ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola hooligan person rally on the street