तब्बल दीडशे कोटी रुपये खर्चकरून उभारलेले रुग्णालय कोरोनाच्या लढाईत उपयोगशुन्य

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 26 May 2020

राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तातडीने पाऊल उचलत आहेत. त्यासोबतच सर्वच पातळ्यांवर दक्षता घेतली जात आहे. परंतु रुग्णांच्या सुविधेसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करुन जिल्ह्यात तयार होत असलेले सुपर स्पेशलिटी रुग्णालय या महामारीच्या काळात कोरोनाग्रस्तांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे रुग्णालयाचा कोविडग्रस्तांसाठी उपयोग शून्य असल्याचे दिसून येत आहे.

 

अकोला :  राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तातडीने पाऊल उचलत आहेत. त्यासोबतच सर्वच पातळ्यांवर दक्षता घेतली जात आहे. परंतु रुग्णांच्या सुविधेसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करुन जिल्ह्यात तयार होत असलेले सुपर स्पेशलिटी रुग्णालय या महामारीच्या काळात कोरोनाग्रस्तांसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे रुग्णालयाचा कोविडग्रस्तांसाठी उपयोग शून्य असल्याचे दिसून येत आहे.

रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यात चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. त्याअंतर्गत हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. सदर चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर इमारत कोरोना महामारीच्या काळात कोविड-१९च्या रुग्णांसाठी उपचार देण्यास सहाय्यक ठरू शकते. परंतु इमारतीचे अंतर्गत काम अद्याप बाकी असल्याने कोरोनाग्रस्तांसाठी सदर इमारत पांढरा हत्ती ठरत आहे.

बलग में छूरी गांव में ढिंढोरा....
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे वसतीगृह ताब्यात घेतले आहे. याठिकाणी रुग्णांना अलगीकरणासह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. परंतु १५० कोटी रुपयांपैकी ७५ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली रुग्णालयाची इमारत कोरोनाग्रस्तांसाठी उपयोगात येत नसल्याचे वास्तव आहे. १५० कोटींपैकी ७५ कोटी रुपये इमारत बांधकाम व ७५ कोटी रुपये उपकरणांवर खर्च करण्यात आले आहेत.

अंतर्गत काम बाकी
निमवाडी परिसरात साकरलेल्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु अद्याप विद्युत कनेक्शनचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना सदर इमारतीत ठेवण्यास अडचण निर्माण होत आहे. परंतु भविष्यातील अडचण लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने विद्युत कनेक्शनची अडचण दूर करण्याच्या कामाला प्राथमिकता दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola hospital built at a cost of Rs 150 crore was useless in the battle of Corona