पॉझिटिव्ह अहवालांची शंभरी पार रुग्णांची शतकाकडे वाटचाल, पुन्हा आढळले 10 पॉझिटिव्ह रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

कोरोनाचे नवे हॉटस्पॉट म्हणून अकोला शहर उदयास येत आहे. दिवसागणिक दहाच्या वरच पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळत असून, आतापर्यंत 105 पॉझिटिव्ह व्हायला आले असून सद्यस्थितीत 80 रुग्ण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहे.

 

अकोला : कोरोनाचे नवे हॉटस्पॉट म्हणून अकोला शहर उदयास येत आहे. दिवसागणिक दहाच्या वरच पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळत असून, आतापर्यंत 105 पॉझिटिव्ह व्हायला आले असून सद्यस्थितीत 80 रुग्ण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी 89 आव्हाल प्राप्त झाले त्यापैकी 79 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर दहा अहवाल पॉझिटिव आले आहेत आतापर्यंत एकशे पाच पॉझिटिव अहवाल आले असून सद्यस्थिती 80 रुग्ण उपचार घेत आहेत.
आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण सहा महिला (त्यात एक १२ वर्षाची मुलगी) व चार पुरुष आहेत. त्यातले आठ जण बैदपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक भगतसिंह चौक माळीपूरा व अन्य एक जुने शहर येथील रहिवासी आहे.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०५
मयत-११,
डिस्चार्ज-१४
डिस्चार्ज-१४

सायंकाळी येणाऱ्या अहवालाकडे लक्ष
गुरुवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते तर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा सात रुग्ण आढळून आले होते अशातच आज शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातच दहा रुग्ण आढळले असून पुन्हा सायंकाळी किती रुग्ण आढळून येतात याकडे अकोले करांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola hundreds of positive reporting patients head for century, 10 positive patients found again