एकाच कुटुंबातील चौघांना संसर्ग, रुग्णांची संख्या 13

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

अकोला जिल्ह्यात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.7) दिली होती. आता याच रुगांच्या कुटुंबातील पुन्हा चार  जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तेव्हा आता अकोल्याची संख्या 13 वर जाऊन पोहचली आहे. दिवसागणिक अकोलेकरांच्या धोक्याची पातळी वाढत आहे. 

अकोला : अकोला जिल्ह्यात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.7) दिली होती. आता याच रुगांच्या कुटुंबातील पुन्हा चार  जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तेव्हा आता अकोल्याची संख्या 13 वर जाऊन पोहचली आहे. दिवसागणिक अकोलेकरांच्या धोक्याची पातळी वाढत आहे. 

 अकोल्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मागील काही दिवसांपासून आढळला नव्हता. मात्र, दिवसागणिक संशयित रुग्णांची संख्या वाढतच होती. अशातच 7 तारखेपासून म धोक्याची घंटा वाजली असून, अकोल्यातही कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर बुधवारी पुन्हा अकोटफाईल येथील एकाचा आणि त्यानंतर पातूर सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. ही संख्या 9 वर गेल्यानंतर यात आता पुन्हा नव्याने 4 जणांची भर पडली आहे. आता अकोल्यात एकूण 13 पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून अद्यापही खूप अहवाल प्रलंबित आहेत.तेव्हा आता तरी अकोलेकर घराबाहेर पडू नका असे आवाहन केले जात आहे. यामध्ये 3 वर्षाची मुलगी, 5 वर्षांचा मूलगा त्यांची आई आणि 30 वर्षांचा पुरुष असे एकाच कुटुंबातील 4 जण बाधीत झाले आहेत. हे कुटुंब बैदपूरा येथील पहिल्या बाधित रुग्णाचे कुटुंबीय आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola infections in the same family, 13 patients