ऑनलाईन पीएचडी देणारे हे ठरले पहिले विद्यापीठ, कोरोनाच्या संकटात घेतली तंत्रज्ञानाची मदत

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 26 May 2020

तुम्हाला पीएचडी करायची असेल तर एक नवा मार्ग सुरू झाला आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञान यात नेहमीच अग्रेसर असणान्या येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पीएच. डी. ऑनलाईन मौखिक परीक्षेचे (ऑनलाईन व्हायवा) आयोजित केले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या संकल्पनेतून व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने पीएच. डी. मौखिक परीक्षा (व्हायवा) आयोजित करणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

 

अकोला : तुम्हाला पीएचडी करायची असेल तर एक नवा मार्ग सुरू झाला आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञान यात नेहमीच अग्रेसर असणान्या येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पीएच. डी. ऑनलाईन मौखिक परीक्षेचे (ऑनलाईन व्हायवा) आयोजित केले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या संकल्पनेतून व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने पीएच. डी. मौखिक परीक्षा (व्हायवा) आयोजित करणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.

युजीसीने कोविड - १९' च्या पार्श्र्वभूमीवर दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या जागतिक संकट काळातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कार्यरत राहणाच्या विद्यापीठाचे या निमित्ताने सर्वत्र कौतुक केले जात आहे. विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेतर्फे रविवारी सकाळी या ऑनलाईन पीएच.डी.मौखिक परीक्षेचे (ऑनलाईन व्हायवा) आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या साथीमुळे टाळेबंदीच्या काळात राज्य शासनाच्या आदेशानूसार महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थाही बंद आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने या टाळेबंदीवर मार्ग शोधत ऑनलाईन शैक्षणिक मार्गदर्शन सुरू ठेवले आहे. वेब रेडिओ, तसेच ऑनलाईन व्हिडीओ लर्निंग सुविधा सातत्याने सुरू आहे. सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा वसा घेतलेल्या मुक्त विद्यापीठाने आपल्या या उपक्रमात खंड पडू न देता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून पीएच. डी. ची मौखिक परीक्षा घेण्यात आली.

महाराष्ट्र शासनात सचिव पदी कार्यरत असलेले अतुल पाटने हे विद्यार्थी होते. 'लोकाभिमुख प्रशासनात अभिनवतेची भूमिका आणि महत्त्व - महाराष्ट्र शासनाच्या प्रगती अभियानात संदर्भात विशेष अभ्यास असा पीएचडीचा विषय होता. जवळपास दोन तास हा ऑनलाईन पीएच. डी. मौखिक परीक्षा सुरू होती. अतुल पाटणे यांनी पॉवरपॉईंट प्रेसेंटेशनद्वारे १२५ स्लाईडसच्या साहाप्याने मुंबईवरून त्यांच्या विषयाचे सादरीकरण केले. त्यानंतर परीक्षकांनी व उपस्थित तज्ज्ञांनी तसेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेत. विद्यापीठ कॉन्फेरन्स रूममध्ये कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, मानव विद्या शाखेचे संचालक प्रा.उमेश राजदेरकर, विद्यापीठातील डॉ. हेमंत राजगुरू, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ.. प्रवीण घोडेस्वार, डॉ. नागार्जून वाडेकर व डॉ. प्रकाश उपस्थित होते. या परीक्षेचे परीक्षक डॉ. श्रीमती शोभा कारेकर पुण्यावरून, डॉ. श्री. बालाजी कतुरवार उपस्थित  होते. सदर परीक्षा खुली असल्यामुळे त्यात चंदीगढ येथून आएएस अधिकारी नीलकंठ अव्हाड, मुंबई येथील जॉईट कमिश्नर श्रीमती अर्चना कुळकणी, अकोल्यावरून शिक्षण तज्ज्ञ प्रा. संजय खडक्कर, नागपूरवरून डॉ. संजय इंगोले, मुंबईवरून डॉ. नाखले व विद्यार्थी असे एकूण ३५ व्यक्ती उपस्थित होत्या. आयोजनाची तांत्रिक बाजू कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांचे मार्गदर्शनाखाली अभय कुलकर्णी व चंद्रकांत पवार यांनी सांभाळली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola It became the first university to offer online PhDs, taking technology help in the crisis of Corona