बापरे! लॉकडाउनमध्येही इथे मिळते दारू, दुसऱ्या जिल्ह्यातून मद्यपी येतात खरेदीला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

टाळेबंदीत शिथीलता देण्यात आली आणि ग्रामीण भागातील दारू विक्रीचे दुकाने उघडी झाली. या निर्णयामुळे तळीरामाना रान मोकळे झाले असले तरी अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावले आहे. अगदी रेड झोन असलेल्या अकोला शहरातील काही जण ग्रामीण भागात जाऊन दारू खरेदी करून ती शहरात आणून विकत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. मात्र, या प्रकार विशेष पथकाचा विशेष वाॅच असून, दोन कारवायात अशांना अटक करण्यात आली आहे.

अकोला : टाळेबंदीत शिथीलता देण्यात आली आणि ग्रामीण भागातील दारू विक्रीचे दुकाने उघडी झाली. या निर्णयामुळे तळीरामाना रान मोकळे झाले असले तरी अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावले आहे. अगदी रेड झोन असलेल्या अकोला शहरातील काही जण ग्रामीण भागात जाऊन दारू खरेदी करून ती शहरात आणून विकत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. मात्र, या प्रकार विशेष पथकाचा विशेष वाॅच असून, दोन कारवायात अशांना अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांनी मागील काही दिवसांत अकोट, हिवरखेड आणि पातूर पोलिस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या कापशी येथे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवायामुळे शहरातील अवैध धंद्याची लालसा असणारे ग्रामीण भागात जाऊन दारूची खरेदी करीत आहेत.त्या दारूची छुप्या मार्गाने शहराकडे वाहतूक करून त्याची राजरोसपणे विक्री करीत आहेत. विशेष म्हणजे यातून या अवैधधंदे चालकाना हजारोंचा नफा मिळत असल्याचे समोर येत आहे.

रेड झोनमधून बाहेर जातात तरी कसे
अकोट, हिवरखेड आणि कापशी येथे विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात शहरातील विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक ग्रामीण भागात जाऊन दारू खरेदी करीत असून,परत येऊन शहरात दारू विक्री करीत आहेत. हे नागरिक रेडझोनमधून ग्रामीण भागापर्यंत पोहचतात तरी कसे असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे.

बाहेर जिल्ह्यातील नागरिक येतात खरेदीसाठी
अकोल्या लगत असलेल्या काही जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक शहरात येऊन ठराविक भागातून खरेदी करून जातात असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देण्याची गरज
ग्रामीण दारू विक्रीची दुकाने सुरू झाली मात्र, एका ग्राहकाला किती बाटल्या द्यावे याची नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी एका-एका जणांकडे बाॅक्स कसे आढळतात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Liquor is also available here in Lockdown, alcoholics from other districts come to shop