लॉकडाउनमध्ये सर्सास विकला कचोरी, समोसा अन् पडले एवढ्यात

सकाळ वृत्तसेेवा
Tuesday, 26 May 2020

कोरोना विषाणूचा फैलाव थांबविण्‍यासाठी अकोला शहरामध्‍ये लॉकडाउन सुरू आहे. जीवनावश्‍यक वस्‍तू वगळता इतर प्रतिष्‍ठानांना उघडी करून समानाची विक्री करण्‍यास बंदी आहे. असे असतानाही सोमवारी ता. 25 मे रोजी जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्ट उघडे करून विक्री सुरू असल्याचे आढळून आले. महापालिका आयुक्त यांच्या पाहणीत ही बाब निदर्शनास आल्यानंतर स्वीट मार्ट संचालकाला 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. लाॅकडाउन दरम्यान या स्वीट मार्टवर मनपाने दुसऱ्यांदा कारवाई केली आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा फैलाव थांबविण्‍यासाठी अकोला शहरामध्‍ये लॉकडाउन सुरू आहे. जीवनावश्‍यक वस्‍तू वगळता इतर प्रतिष्‍ठानांना उघडी करून समानाची विक्री करण्‍यास बंदी आहे. असे असतानाही सोमवारी ता. 25 मे रोजी जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्ट उघडे करून विक्री सुरू असल्याचे आढळून आले. महापालिका आयुक्त यांच्या पाहणीत ही बाब निदर्शनास आल्यानंतर स्वीट मार्ट संचालकाला 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. लाॅकडाउन दरम्यान या स्वीट मार्टवर मनपाने दुसऱ्यांदा कारवाई केली आहे.

मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या पाहणी दरम्‍यान अकोला महानगरपालिका पूर्व क्षेत्रातील जठारपेठ चौक स्थित गणेश स्‍वीट मार्ट या व्‍यावसायिकाने परवानगी नसूनही उपहार गृह सुरू ठेवून प्रतिष्‍ठातून कचोरी, समोसा आदी सर्रासपणे विक्री सुरू केली असल्याचे आढळून आले. काही ग्राहक तिथेच थांबून नाश्‍ता करीत असल्‍याचे आढळून आल्‍याने उपहारगृह मालकावर 50 हजार रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली.

यावेळी मनपा आयुक्‍त कापडणीस यांनी शहरामध्‍ये ज्‍या व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांना परवानगी देण्‍यात आलेल्‍या आहेत फक्‍त त्‍यांनीच प्रशासनाने ठरवून दिलेल्‍या वेळेमध्‍ये दुकाने उघडावी व सोशल डिस्‍टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करून मास्‍क व सेनीटायझरचा वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्‍यासाठी सहकार्य करण्‍याचे आवाहन केले आहे. यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, आरोग्‍य निरीक्षक शैलेश पवार, राजेश पथरोट, सूरज गणोजे, सुनील कंडेरा, सोहम कुलकर्णी, प्रवीण मनोहर व अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola lockdown, Sarsas sold kachori, samosa and fell, ganesh sweet mart jatharpeth