रात्री उशीरापर्यंत घेतले 80 संशयित नागरिकांच्या घश्याचे नमुने

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

शहरामध्‍ये कोरोनाचे वाढते रुग्‍ण लक्षात घेता महानगरपालिकेच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात संशयित नागरिकांच्या घस्याचे स्त्रावाचे नमुने घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ८० संशयित नागरिकांचे नमुने घेण्यात आले.

 

अकोला :  शहरामध्‍ये कोरोनाचे वाढते रुग्‍ण लक्षात घेता महानगरपालिकेच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात संशयित नागरिकांच्या घस्याचे स्त्रावाचे नमुने घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ८० संशयित नागरिकांचे नमुने घेण्यात आले.

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रातील संशयीत नागरिकांची चाचणी तातडीने व्‍हावी यासाठी घस्‍यातील स्‍त्रावाचे नमुने घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये टिळक रोडवरील मनपा किसनीबाई भरतीया रूग्‍णालय येथे त्यासाठी स्‍वतंत्र व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या कामास आजपासून सुरूवात करण्‍यात आली. नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांव्‍दारे घेण्‍यात आले आहे. नमुने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्‍यात आले आहे. मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण ८० संशयित नागरिकांचे घस्‍याचे स्‍त्रावाचे नमुने घेण्‍यात आले. या सर्व नागरिकांना होम क्‍वारंटाईन करण्‍यात आले आहे. पुढील दोन दिवसांत अपेक्षित चाचणी अहवाल येणार आहे. पॉझिटिव्‍ह अहवाल आलेल्या नागरिकांना शासकीय वैद्यकीय रूग्‍णालयामध्‍ये आवश्‍यक उपचारासाठी पाठविण्‍यात येणार आहे. निगेटिव्‍ह चाचणी अहवाल आलेल्या नागरिकांना १४ दिवसांकरिता त्‍यांचे घरी होम क्‍वारंटाईन करण्‍यात येणार आहे.

हे डॉक्टर देतायते सेवा
शासकीय वैद्यकीय महाविद्यायातील डॉ.फराह जिकारे, डॉ.गणेश पारणे, डॉ.पूजा कोहर, डॉ.विद्या डोले यांच्‍याव्‍दारे घस्‍यातील स्‍त्रावाचे नमुने घेण्‍यात आले. त्‍यांच्या मदतीसाठी जिल्‍हा आरोग्‍य विभागाचे डॉ.भास्‍कर सगणे, डॉ.अशोक पातोर्डे, डॉ.सुरेश ढोरे, डॉ.प्रियेश शर्मा, डॉ.रचना सावळे, डॉ.प्रज्ञा खंडेराव, डॉ.नंदकिशोर हागे, डॉ.तौसिफ इकबाल अनीस अहमद तसेच मनपा वैद्यकीय विभागाचे डॉ.फारूख शेख, डॉ.प्रभाकर मुदगल, डॉ.अस्मिता पाठक यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय चव्‍हाण, डॉ.कादरी, डॉ.विपिन जाधव, डॉ.वासिक अली, डॉ.मुसलोद्दीन आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola muncipal hospital take late night test of corona