राज्यातील गणित शिक्षकांचा विद्यार्थ्यांसाठी `सेतू`

मनोज भिवगडे
Friday, 17 April 2020

नववी व दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणारे वर्ष असते. यावर्षी नेमके याच काळात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आणि सर्वत्र लॉकडाउन झाले. परिणामी शाळा-महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होऊ लागला आहे.

 

अकोला : कोरोना विषाणूमुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे विशेषतः नववी-दहावीतील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान पूर्णपणे भरून काढणे शक्य नसले तरी सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरीबसून मार्गदर्शन मिळावे या हेतूने नांदेड येथील गणित शिक्षकाने पुढाकार घेवून विद्यार्थ्यांसाठी `गणित शिक्षणाचा सेतू' बांधला आहे.  

दिलासादायक : आठ पॉझिटिव्ह रुग्ण दुबार तपासणीनंतर निगेटिव्ह

नववी व दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणारे वर्ष असते. यावर्षी नेमके याच काळात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आणि सर्वत्र लॉकडाउन झाले. परिणामी शाळा-महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होऊ लागला आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागासह राज्यभरातील अनेक शिक्षकांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन सुरू केले आहे.

हेही वाचा - यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 कोटी

सोशल माध्यमांचा वापर
गणित अध्यापक मंडळाच्या माध्यमातून नांदेड येथील सतिश नारंगळे यांनी  सोशल माध्यमाचा आधार घेत स्टेट बोर्डाचा अभ्यास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा सेतू निर्माण केला. या सेतूत त्यांनी गणित अभ्यास महामंडळाचे परीक्षा समिती प्रमुख एस.के. बिराजदार (सोलापूर) यांच्या सहाकार्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गणित शिक्षकांना जोडून घेतले आहे.

क्लिक करा- बाळा मी लवकरच येईल...

अकोला, बुलडाण्यातील शिक्षकही सेतूत
गणित विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या शिक्षण सेतूत अकोला येथील उमेश रेडेकर, सुरेश बोरेकर व बुलडाणा जिल्ह्यातील प्रमोद ठोंबरे हे शिक्षकही यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

असे करतील मार्गदर्शन
गणित विषयाचा अभ्यास करणाऱ्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर एक तासाचे व्हिडीओ लेक्चर तयार करून ते विद्यार्थ्यांपर्यंत फेसबूक व व्हॉटस्अपच्या माध्यमातून पोहोचविले जाईल. विद्यार्थ्यांना फेसबूक ग्रूपवर शिक्षण सेतू नावाने सर्च करून या ग्रुपसोबत जुडता येईल.

तीन दिवसांत 1500 सदस्य
शिक्षण सेतू हा गणित विद्यार्थी व शिक्षकांसाठी फेसबूकवर 14 एप्रिल रोजी तयार केलेल्या ग्रूपला तीन दिवसांत 15 सदस्य जुडले आहेत.

ग्रामीण भागात पोहोचण्याचा उद्देश
ऑनलाइन शिक्षण हा सध्या शहरी भागापुरता मर्यादित आहे. मात्र गणित शिक्षकांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. सोशल माध्यमाचा आधार घेत ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे हा या हा ग्रूप तयार करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे गणित अध्याप मंडळाच्या परीक्षा समितीचे प्रमुख एस.के. बिराजदार यांनी सकाळशी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यासाठी एक वेळापत्रकही तयार केले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news Setu for mathematics teachers in Maharashtra