इन्होवेटीव्ह :शेतीच्या साहित्यातून केले तयार सॅनिटायझर यंत्र

विवेक मेतकर
Monday, 13 April 2020

सध्या कोरोना विरूद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई पोलिस लढतायेत. अनेक लोकांशी त्यांचा थेट संपर्क येतोय. त्यामुळे कोरोना लागणीची भीती अधिक आहे. पोलिसांना कोरोनापासून बचाव कवच म्हणून अकोल्यातील नेहरू पार्कचे संचालक बी.एस. देशमुख यांनी शेती पंपाचे साहित्यामध्ये स्वयंचलित यंत्रणा बसवून सॅनिटायझर यंत्र तयार केलं आहे. अकोल्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनसह जिल्हाधिकारी कार्यालयात ते नि:शुल्क संपूर्ण युनिट तयार करून दिले आहे.

 

अकोला : सध्या कोरोना विरूद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई पोलिस लढतायेत. अनेक लोकांशी त्यांचा थेट संपर्क येतोय. त्यामुळे कोरोना लागणीची भीती अधिक आहे. पोलिसांना कोरोनापासून बचाव कवच म्हणून अकोल्यातील नेहरू पार्कचे संचालक बी.एस. देशमुख यांनी शेती पंपाचे साहित्यामध्ये स्वयंचलित यंत्रणा बसवून सॅनिटायझर यंत्र तयार केलं आहे. अकोल्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनसह जिल्हाधिकारी कार्यालयात ते नि:शुल्क संपूर्ण युनिट तयार करून दिले आहे.

सर्वाधिक लोकांच्या संपर्कात येत असलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर्स आणि पोलीस आहेत. डॉक्टर्स रुग्णालयात तर पोलिस थेट रस्त्यावर या कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीत सर्वाधीक असुरक्षित आहेय ते म्हणजे पोलिस दादा. त्यांच्या आरोग्याच्या चिंतेने अकोल्यातील नेहरू पार्कचे संचालक बि.एस देशमुख यानी वेगवेगळ्या मशीनवर प्रयोग करुन सात दिवसाच्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाला.  देशमुख यांनी आपल्या कल्पनेनी शेतीत फवारणी साठी उपयोगात येणाऱ्या फवारणी यंत्राच्या साहाय्याने हा स्वयंचलित यंत्र तयार केला .

 

या यंत्रच वैशिष्ट म्हणजे हा यंत्र स्वयंचलित असून फवारणीतून द्रव्याची नासाडी होत नाही .या निर्जंतुकीकरण कक्षात प्रवेश करताच या  चौकटीत उभं राहिल्यास या खाली असलेला सेन्सरमुळे समोर असलेल्या या पाईपमधून औषधी द्रव्याचा फवारा बाहेर येतो. या यंत्रात सेन्सर लावण्यात आल्याने याची किंमत वीस हजारांपर्यंत गेलीय. मात्र देशमुख हे यंत्र अकोल्यातील सर्व पोलीस ठाण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात मोफत देत आहेत.

सध्या अकोला शहरातील ८ पोलीस स्टेशन , पोलीस मुख्यालय आणि एक फिरणाऱ्या ह्वॅनमध्ये निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्या आलं आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये ही यंत्र लावल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी आणि शासकीय कार्यालयात ही यंत्र लावण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय. तर यासाठी लागणाऱ्या सॅनिटायझरचा खर्च हे मात्र कार्यालय स्वतः करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola news sanitizer made from agricultural materials