esakal | अकोल्यात कोरोना पॉझिटीव्हची संख्या नऊवर
sakal

बोलून बातमी शोधा

akola nine corona positive

मंगळवारी बैदपुरा परिसरात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळलल्यानंतर आता बुधवारी  अकोटफैल परिसरातील दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने अकोलेकरांच्या ऱ्हदयाचे ठोके वाढले होते. आता शहरा सोबतच कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहोचला

अकोल्यात कोरोना पॉझिटीव्हची संख्या नऊवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : काही दिवसापूर्वी एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नसलेल्या अकोला शहरात आणि जिल्ह्यात लोगो पाठ  पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत  काही दिवसापूर्वी  वाशिम जिल्ह्यातील  मेडसी  येथे  आढळलेल्या  पॉझिटिव रुग्णाच्या  संपर्कात आलेले  पातुर आणि फॅक्टरी येथील  पंधरा जणांनी पैकी  गुरुवारी  सकाळी  सकाळी  सात जणांचे अहवाल  पॉझिटिव आल्याचे  माहिती प्राप्त झाली आहे  तेव्हा आता  अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  9  वर जाऊन पोहोचली आहे .

 मंगळवारी बैदपुरा परिसरात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळलल्यानंतर आता बुधवारी  अकोटफैल परिसरातील दुसरा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने अकोलेकरांच्या ऱ्हदयाचे ठोके वाढले होते. आता शहरा सोबतच कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहोचला असून पातूर आणि  खेत्री या गावातील पंधरा जणांपैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोला कर यांच्या चिंतेत भर पडली आहे आता या सात जणांनी आणखी किती जणांपर्यंत या विषाणूचा पहिला केला हे पाहणे आरोग्य विभागा समोर मोठे आव्हान ठरत आहे तेव्हा बुलढाणा पाठोपाठ अकोल यातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे अकोले करांसाठी धोक्याची घंटी असून आतातरी घरातच थांबा असे म्हणण्याची वेळ आली आहे

loading image
go to top