esakal | आयुक्त म्हणतात: मदतीचा अतिरेक नको, एका छताखाली येऊन गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे
sakal

बोलून बातमी शोधा

akola no need for extra help

कोरोना विषाणूचा संसर्ग महानगपालिका क्षेत्रात होऊ नये म्हणून संपूर्ण यंत्रणा आहे त्या परिस्थितीतीच कामाला लागली. आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेला क्षमता असो किंवा नसो पूर्ण ताकदीनिशी त्याचा सामना करावा लागतो. मनपापुढे अपुरे मनुष्यबळ ही मोठी अडचण होतीच. मात्र त्यामुळे काम थाबंता कामा नये यासाठी सर्वात आधी मनुष्यबळाचे नियोजन आणि त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्यात. एकाच वेळी कार्यालयात आणि शहरातही यंत्रणा राबवत आहे.

आयुक्त म्हणतात: मदतीचा अतिरेक नको, एका छताखाली येऊन गरजूंपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : कोरोना विषाणूचे संकट कोसळले तेव्हा महानगपालिकेत सर्वच काही आलबेल नव्हते. साधनसामुग्री, आर्थिक परिस्थिती, मुष्यबळ या सर्वांचीच कमरता होती. असे असले तरी या सर्व बाबी कुरवाळ बसत मदतीची प्रतीक्षा करीत बसण्याची वेळ नव्हती. उपलब्ध साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करून कोरोनाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला. यात बऱ्यापैकी यशस्वी झालो असलो तरी अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी सर्व जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


कोरोना विषाणूचा संसर्ग महानगपालिका क्षेत्रात होऊ नये म्हणून संपूर्ण यंत्रणा आहे त्या परिस्थितीतीच कामाला लागली. आपत्तीच्या काळात शासकीय यंत्रणेला क्षमता असो किंवा नसो पूर्ण ताकदीनिशी त्याचा सामना करावा लागतो. मनपापुढे अपुरे मनुष्यबळ ही मोठी अडचण होतीच. मात्र त्यामुळे काम थाबंता कामा नये यासाठी सर्वात आधी मनुष्यबळाचे नियोजन आणि त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्यात. एकाच वेळी कार्यालयात आणि शहरातही यंत्रणा राबवत आहे.

अतिरिक्त जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांकडील भार कमी करून ज्यांची कामे लॉकडाउनमध्ये थांबली होती, त्यांच्याकडे कामांचे विभाजन केले. स्वतंत्र झोन अधिकारी नियुक्त केले. कार्यालयाची जबाबादारी उपायुक्त वैभव आवारे तर तांत्रिक बाजू डॉ. फारूख यांच्याकडे सोपविली. शासनाकडे पाठवायच्या अहवालाच्या जबाबदारीचे काम उपायुक्त गर्गे यांच्याकडे सोपविले. इतरांनाही जबाबदारी वाटून दिली. आहे त्या सामुग्रीतच काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. वाहन विभाग, आरोग्य यंत्रणा, स्वच्छतेच्या कामात कुठेही कमी पडणार नाही यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी शेतकऱ्यांकडील ट्रॅक्टरही मागवून घेतले. त्यामुळे कठीण प्रसंगात अपुरी साधनसामुग्री असतानाही मनपाची यंत्रणा सक्षणपणे उभी राहू शकली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर
अपूर्ण मनुष्यबळात आयुक्तांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्चमारी, अधिकाऱ्यांचे छोटे-छोटे व्हॉटस् ॲप ग्रूप तयार करण्यात आले. त्यावरून शहरातील घडामोडीचा फिडबॅक मिळत होता आणि यंत्रणांना आवश्‍यक सूचना देणेही शक्य झाले.

पहाटे ५ वाजतापासून कामाची सुरुवात
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नियोजनाला फार महत्त्व होते. त्यासाठी सकाळी ५ वाजतापासूनच नियोजनाला सुरुवात होत होती. पहाटे ५.३० वाजता बाजारात व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून लिलाव वेळेत संपविणे आणि गर्दी होऊ न देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर ६.३० वाजता सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून कामांचे वितरण केले जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

साधनसामुग्रीची जुळवाजुळव
युद्धजन्य परिस्थिती होती. असावेळी साधनसामुग्री नाही म्हणून रडत बसण्याची वेळ नव्हती. डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे जाणवत होते. पण आहे त्या साधनसामुग्रीचे नियोजन करून आणि प्रसंगी बाहेरून मदत घेवून जुळवाजुळव करीत हा लढा सुरू आहे. बाहेर गावाहून आलेल्यांचा शोध, मकरजमधील उपस्थितांचा शोध घेण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

भविष्यात मनपाच्या सुसज्य हॉस्पिटलची गरज
कोरोना लढ्यातून मिळालेला अनुभव मोठा आहे. कमी साधनसामुग्रीत कर्मचाऱ्यांनी केलेले काम, त्यांचे नियोजन व सर्वांचे मिळालेले सहकार्य महत्त्वाचे होतेच. त्यासोबतच अशा प्रसंगांना सामोरे जाताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय, सरकारी दवाखाने यांच्या सहकार्यामुळे मनपाच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला नाही. मात्र भविष्यात अशा प्रसंगांना सामोरे जाताना महापालिकेचे सुसज्य मोठे हॉस्पिटल तयार करण्याची गरज असल्याचे आयुक्त संजय कापडणीस म्हणाले.

एका छताखालून व्हावी मदत
संकटाच्या काळात सर्वच मतदतीसाठी बाहेर येतायेत ही बाब चांगली आहे. मात्र त्याचा अतिरेक होताना दिसतो आहे. बाहेर पडायचे म्हणून काही जण त्याचा गैरफायदा घेत आहे. ज्यांना कुणाला मदत करावयाची आहे, त्यांनी शासकीय यंत्रणांच्या एका छताखालून आणि मनपाच्या सोशल सेलमधून करावी. जेणे करून गरजूंपर्यंत समप्रमाणात खाद्यपदार्थ व अन्नधान्य पोहोचता येईल. काही ठिकाणी सर्वच जण खाद्यपदार्थ पोहचवित आहे. खाणारे कमी असल्याने अशावेळी अन्न फेकून दिले जात असल्याचे विदारक चित्रही बघावयास मिळत आहे. त्यामुळे एका छताखालून मदतीचे वाटप झाल्यास योग्य व समप्रमाणात वाटप होऊ शकेल, असे आवाहन आयुक्तांनी केले.

घराबाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा!
वारंवार सांगितल्यानंतरही लोकांना कोरोना विषाणू संसर्गाचे गांभिर्य कळत नसल्याचे दिसते. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका आहे. हे लक्षात घेवून लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त संजय कापडणीस यांनी केले. 

loading image