‘जन्मदाताच मारक ठरू नये म्हणून ते अलगिकरणात’  17 दिवसांच्या बाळाला केले दूर 

शुभम बायस्कार
Wednesday, 29 April 2020

कोरोना महामारीशी जग झुंज देत आहे. विविध क्षेत्रातील अत्यावश्‍यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. याच क्रमात एक मोठी बाब समोर आली आहे

 

अकोला  ः जन्मदात्री जरी आई असली तरी मुलाला वाढविण्यासाठी बाप प्राणपणाने झटत असतो. जन्मापासून ते मोठे होईपर्यंत त्याच्याविषयी विविध स्वप्ने तो रंगवित असतो. हे स्वप्न रंगवित असतानाच केवळ १७ दिवसातच कोरोना महामारीमुळे त्याला आपल्या चिमुकल्यापासून दुर होण्याची वेळ आली. मुलाला सोडून त्याने आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. आपल्या बाळाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्याने चक्क आपली बँग भरून अलिगकरणात राहण्याचा निर्णय घेतल्याने कर्तव्यनिष्ठेची नवी परिभाषा समोर येताना दिसत आहे.

कोरोना महामारीशी जग झुंज देत आहे. विविध क्षेत्रातील अत्यावश्‍यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. याच क्रमात एक मोठी बाब समोर आली आहे. त्यामध्ये ‘जन्मदाताच आपल्या बाळाला मारक ठरू नये’ म्हणून त्याने चक्क आपल्या १७ दिवसांच्या बाळापासून दुरावा घेण पंसत केल आहे. जन्माचा अधिकारी जरी स्रीला असला तरी आपल्या बाळाचे भरणपोषण करणे. त्याच्या भविष्याची विविध स्वप्न ही वडिलांकडून पाहिल्या जातात. मात्र हे सारं केवळ कोरोनामुळे अधूर राहिलं. आपल्या पत्नीची प्रसृती झाल्याबरोबर मुलाला व आईला बापाचे प्रेम देणे आवश्‍यक असतानाच त्यांनी ‘सेवा ही परमोधर्म’ ब्रिद अंगीकारून कर्तव्याला प्राधान्य दिले.

कितीही कर्तव्यावर अपार निष्ठा असणारी बाब आहे. हा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच नाव आहे डॉ.उमेश कावलकर, ते अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाच्या जन औषध वैद्यकशस्र विभागात कार्यरत आहेत. कोरोनामुळे मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांच्याकडे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या विभागून देण्यात आल्या आहेत.

डॉ.कावलर यांच्याकडे कोरोना अहवालाची रिपोर्टींग वरिष्ठांना करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जीएमसीचे ते कोरोना नोडल अधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी डॉ.प्रिती या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यकरत आहेत. डॉ.प्रिती यांची ९ एप्रिलरोजी प्रसुती झाली. घरात नवीन पाहून आल्याचा आनंद होताच. मात्र या नव्या पाहून्यांशी पूर्णवेळ खेळण्या बागळ्याचा स्वप्न असतानाचा डॉ.कावलर यांना त्याच्यापासून दुरा घेण्याचा वेळ आली. ते आपल्या १७ दिवसांच्या बाळापासून व पत्नी डॉ.प्रितीसह परिवारपासून अलिगीकरणात राहत आहेत. कोरोना महामारीत अघोषीत रजेवर जाणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दिसून येत असतानाच डॉ.कावलर यांनी तसे न करता आपल्या कर्तव्यावर अपार प्रेम करीत मेडिकल कॉलेजमध्ये ते सेवा देत असल्याने कर्तव्याची नवी परिभाषा त्यांनी प्रस्थापीत केली आहे.

अन् त्यांनी ठेवला ह्रदयावर दगड
आपल्या घरात जेव्हा नवा पाहून येतो, तेव्हा संपूर्ण घरात आंनदाचे वातावरण पसरलेले असते. प्रत्येक बापाला वाटतं या नव्या पाहून्यासोबत आपण सेल्फी काढवी. सोशल मीडियावर ती प्रसारीत करावी, आणि बाप झाल्याचा आनंद सांगावा. मात्र डॉ.कावलर यांना त्यांच्याबाळासोबत सेल्फीही घेता आली नाही. त्याला पूर्णवेळ देताही आला नाही, १७ दिवसातच त्यांनी ह्रदयावर दगड ठेऊन कठोर निर्णय घेतला आणि बँग भरून त्यांनी अलिगिकरणाचा मार्ग निवडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola officer take prevention of his new born baby