लॉकडाऊन: राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केले ऑनलाईन शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

तेल्हारा तालुक्यातील समता शिक्षक फाउंडेशनच्या सभासदांनी लॉकडाउनच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करता यावा म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून टेस्ट सिरीज तयार केल्या. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, थोरांची ओळख, भाषा व्याकरण, हिंदी  यासारख्या विषयांच्या प्रश्न संचयिका आपापल्या घरीच बसून शिक्षकांनी एका दिवसात पहिली ते सातवीच्या शंभर टेस्ट सिरीज तयार केल्या आहेत.

 

अकोला : तेल्हारा तालुक्यातील समता शिक्षक फाउंडेशनच्या सभासदांनी लॉकडाउनच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास करता यावा म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून टेस्ट सिरीज तयार केल्या. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, थोरांची ओळख, भाषा व्याकरण, हिंदी  यासारख्या विषयांच्या प्रश्न संचयिका आपापल्या घरीच बसून शिक्षकांनी एका दिवसात पहिली ते सातवीच्या शंभर टेस्ट सिरीज तयार केल्या आहेत.

या टेस्ट सिरीजचा फायदा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक घेऊ शकतात. तशा प्रकारच्या लिंक विविध व्हाट्सअप ग्रुप वर महात्मा फुले जयंतीपासून प्रसारित करण्यात आल्या.  शाळा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरीच अध्ययन साहित्य उपलब्ध व्हावे व अध्ययनाची प्रक्रिया सहज खेळत उपलब्ध व्हावी या हेतूने राबविलेल्या या उपक्रमाचे राज्यभर कौतुक होत आहे. 

टेस्ट सिरीज निर्माण करून शिक्षणाची कवाडे स्त्रीया व सर्व समाजासाठी उघडे करणाऱ्या महात्मा फुले यांना आदरांजली देण्याची संकल्पना तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खंडाळा येथील अध्यापक गोपाल बाळकृष्ण मोहे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यासाठी समता शिक्षक फाऊंडेशनचे प्रवीण चिंचोळकर, अमोल ढोकणे, संदीप भड, निखील गिऱ्हे, मंगेश  पवार,दीपक पोके,तुळशीदास खिरोडकर, उमेश  तिडके, गोपाल गिऱ्हे, नितीन तराळे,संजय गासे,तेजराव वाकोडे,अर्चना खिरोडकार, दीपाली वानखडे, वंदना ढोकणे यांनी  पुढाकार घेतला.  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा बंद असल्या तरी समता शिक्षक टेस्ट सिरीज च्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांची ऑनलाइन शाळा भरून महाराष्ट्रातील  शैक्षणिक प्रक्रिया सुरूच राहण्यासाठी खुप मोठा हातभार लागणार असून घरात बसून आरोग्य अबाधित राहणार आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज लिंकद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी उपयुक्त ठरतील.
-गोपाल मोहे  (अध्यापक)

कोरोना विषाणूपासून बचावासाठी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज सोडवून घरातच मोबाईल वर अभ्यास करावा.
- तुलसीदास खिरोडकार (बालरक्षक )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola online exam school student