अतिउत्साही तरूण म्हणतात हम नही सुधरेंगे,  कोरोनातही रस्त्यावरील घोळके वाढले, पोलिसांकडून कारवाईला खो

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

राज्यासह जिल्ह्यात संचारबंद लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एकावेळी रस्त्यावर घोळका करण्यास मनाई आहे. असे असतानाही अतिउत्साही तरूण रस्त्यावर उतरत असल्याने पोलिसांना त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी लागणार आहे.

अकोला  : राज्यासह जिल्ह्यात संचारबंद लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एकावेळी रस्त्यावर घोळका करण्यास मनाई आहे. असे असतानाही अतिउत्साही तरूण रस्त्यावर उतरत असल्याने पोलिसांना त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी लागणार आहे.

अकोला शहारतील महंमद अली रोड, टिळक रोड, गौरक्षण रोड, रिंग रोड कौलखेड, खदान, उमरी, जठारपेठ परिसरासह अनेक भागातील रस्त्यांवर अतिउस्हाही तरूण मला काय होते, आया अर्विभावात रस्त्यावर घोळके करून फिरताना दिसत आहे. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी दंडूक्यांचा प्रसाद दिला होता.

यात कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्यांनाही पोलिसांचा मार खावा लागला. त्यामुळे पोलिसांना संयमाने वागण्याचे आदेश देण्यात आले. त्याचा गैरफायदा घेवून काही अतिउत्साही तरूण पुन्हा रस्त्यांवर दिसून लागले आहेत. टिळक रोडसह काही भागात पोलिसांनी या अतिउत्साही तरूणांना खाकीचा प्रसाद दिला. मात्र पोलिस निघून गेल्यानंतर ही घोळकी पुन्हा रस्त्याने फिरताना दिसत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांनीच असे तरुणांचे घोळके फिरताना दिसत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन व शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच हरताळ फासली जात आहे. पोलिसांनी रात्रीचे गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे.

हम नही सुधरेंगे
प्रशासनाकडून वारंवार गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानंतरही नागरिक बाजारपेठा आणि किरणा दुकांनांमध्ये गर्दी करताना दिसत आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवा संचारबंदीच्या काळातही नियमित सुरू राहणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे पुन्हा नागरिक विसरले आहेत. स्वतःसह इतरांचेची आरोग्य धोक्यात आणत आहे. वारंवार सूचना देवूनही हम नही सुधरेंगे, अशीच स्थिती अकोल्यात एकंदर दिसून येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Overzealous youths say we will not improve, road congestion has increased in Corona too, police take action