परजिल्ह्यातून परतलेले प्रवासीही कोरोना संशयित!, २० प्रवाशांमध्ये आढळली कोरोनाची लक्षणे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे मुंबई, पुणे, नागपूर यासह इतर जिल्ह्यातून व परप्रांतातून नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. संबंधित नागरिक शिक्षणासह उदरनिर्वाह किंवा नोकरीसाठी इतर ठिकाणी गेले होते. परंतु संबंधित नागरिक ज्या गावातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

अकोला : कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आवागमनास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. असे असले तरी परजिल्ह्यात काही कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नुकतेच अटी-शर्तींवर अकोला जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे. त्यापैकी ८ हजार ७१५ प्रवाशांना जिल्ह्यात एन्ट्री दिली असून, त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता २० प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.

परिणामी त्यांना अधिक उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित करण्यात आले आहे. तर काही प्रवाशांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे मुंबई, पुणे, नागपूर यासह इतर जिल्ह्यातून व परप्रांतातून नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. संबंधित नागरिक शिक्षणासह उदरनिर्वाह किंवा नोकरीसाठी इतर ठिकाणी गेले होते. परंतु संबंधित नागरिक ज्या गावातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

त्याठिकाणी कोरोना विषाणूने अनेक नागरिकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्या सोबतच इतर नागरिकांना सुद्धा त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता आहे. परिणामी अशा नागरिकांची जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये तपासणी करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान संशयित आढळणाऱ्या व्यक्ती अलगीकरणात ठेवण्यात येत आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इतर जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात परतलेल्या ७ हजार २५५ प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त १ हजार ४६० नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी खंडित होण्यास मदत होईल, असा दावा आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.

असे आहेत संदर्भित प्रवाशी
अकोला तालुक्यातून चार बार्शीटाकळी मधून चार व पातुर तालुक्यातून १२ अशा २० प्रवाशांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना संशयित असल्यामुळे संदर्भित करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Passengers returning from the district also suspected corona! Corona symptoms found in 20 passengers