टाळेबंदीतील शिक्षण पद्धतीवर आता तयार होणार  प्लान ‘ए’व प्लान ‘बी’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

टाळेबंदीच्या काळात शिक्षण गतीमान करण्यासाठी जिल्हास्तरीय लर्न फ्राम हाेम समितीची अाॅनलाईन सभा मंगळवारी (ता. २६) पार पडली. सभेत टाळेबंदीतील शिक्षण पद्धतीवर निर्णय झाले असून, प्लान ‘ए’ व ‘बी’ होणार तयार आहे

अकोला  : टाळेबंदीच्या काळात शिक्षण गतीमान करण्यासाठी जिल्हास्तरीय लर्न फ्राम हाेम समितीची अाॅनलाईन सभा मंगळवारी (ता. २६) पार पडली. सभेत टाळेबंदीतील शिक्षण पद्धतीवर निर्णय झाले असून, प्लान ‘ए’ व ‘बी’ होणार तयार आहे.

या संदर्भात ॲक्शन प्लानच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समितीस्तरावर मंडळ गठित करण्यात येणार आहे.
सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यामध्ये गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने ऑनलाईन अभ्यासक्रम, उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही दिवस शैक्षणिक कार्य आणखी प्रभावीपणे हाेण्यासाठी मंगळवारी जिल्हास्तरीय लर्न फ्राम हाेम समितीची ऑनलाईन सभा झाली.

या वेबीनारला मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, डायटचे प्रा. समाधान डुकरे , उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे, सी.एम. फेलाे शुभम बडगुजर, शिक्षक शत्रुघ्न बिरकड, तंत्रज्ञ भुतडा, दिनेश तायडे, विस्तार अधिकारी अरविंद जाधव विनोद मानकर आनंद नांदूरकर उपस्थित होते. संचालन आणि आभार प्रशांत अंभोरे यांनी केले.

पुढील महिन्यात चांगला निर्णय शक्य
राज्यात १५ जूननंतर सर्व परिस्थिती समजणार असून, त्यानंतर अधिक चांगला निर्णय घेता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले. ॲक्शन प्लानच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्याप्रमाणे तालुका पातळीवर संबंधित गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती नेमण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. नियाेजन व अंमलबजावणीसाठी तंत्रस्नेही शिक्षक,अधिकारी-कर्मचारी यांची मदत घेण्यात येणार आहे. किमान दाेन महिन्यांचे ई-साहित्य तयार करण्यात येणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Plan 'A' and 'B' will be based on lockout education system