Video: विनाकारण रस्त्यांवर गर्दी करणाऱ्यांविरुद्ध हवी कठोर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 March 2020

कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सामूहिक संपर्क टाळणाऱ्या देशांवर आज गंभीर परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनसारखा पर्याय निवडला आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली आहे. असे असतानाही अकोला शहरातील रस्त्यांवर सोमवारी सकाळपासून नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. आवश्‍यक सेवा देणाऱ्यांसोबतच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने ‘ॲक्शनमोड’वर येण्याची गरज आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सामूहिक संपर्क टाळणाऱ्या देशांवर आज गंभीर परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनसारखा पर्याय निवडला आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली आहे. असे असतानाही अकोला शहरातील रस्त्यांवर सोमवारी सकाळपासून नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. आवश्‍यक सेवा देणाऱ्यांसोबतच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने ‘ॲक्शनमोड’वर येण्याची गरज आहे.

अकोला शहरासह जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेही एकावेळी पाच पेक्षा अधिक लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे.

 

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा 31 मार्चपर्यंत लाकडाऊन करण्यात आल्या आहेत. एसटी बस व खासगी वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. रेल्वेही पुढील दिन दिवस बंद राहमार आहे. अत्यावश्‍यक वस्तूची दुकानेच सुरू ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. बाजारपेठा बंद असतानाही बाजारात विनाकारण बसून असणारे नागरिक दिसत आहे. टाईमपास म्हणून बाजारपेठेत बसूनच पत्ते, क्रिकेट खेळणारी टोळकी दिसत आहेत. अशा बिनकामांच्या लोकांना रस्त्यावर उतरण्यास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. पोलिस, मनपा प्रशासनाला वारंवार याबाबत सूचना दिल्या जात आहे. असे असतानाही नागरिक रस्त्यावर विनाकारण गर्दी करीत असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध बळाचा वापर करण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पोलिस यंत्रणेला गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याची आवश्‍यकता आहे.

अत्यावश्‍यक सेवेसाठी ओळखपत्र बाळगा
शहरातील जे नागरिक अत्यावश्‍यक सेवा देत आहे त्यांनी घराबाहेर पडताना ओळखपत्र जवळ बाळगावे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण गर्दी करणाऱ्याविरुद्ध पोलिसांना कठोर कारवाई करणे शक्यत होईल. ज्यांना अत्यावश्‍यक आहे त्यांनीच बाहेर पडावे. त्यामुळे गर्दी तर कमीच होईलच, शिवाय ज्यांना आवश्‍यक आहे त्यांना गरजेच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी न करता बाहेर पडता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola police should be take an action