पोलिसांनी मुजोर वाहनधारकांना शिकवला धडा!, लाॅकडाउन तीनमध्ये केली पंधरा हजार वाहनांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

लॉकडाउन तीन नंतर १८ मेपासून सर्वजण लॉकडाउन चारमध्ये प्रवेश करणार आहेत. अशातच आता या तीन लॉकडाउनमध्ये अकोला शहर वाहतूक वभागाने मुजोर अकोलेकरांना चांगलाच धडा शिकविला आहे. या दरम्यान तब्बल दीड हजार वाहने जप्त केली असून, पंधरा हजार वाहनांवेर दंडात्मक कारवाई केली आहे.

 

अकोला : लॉकडाउन तीन नंतर १८ मेपासून सर्वजण लॉकडाउन चारमध्ये प्रवेश करणार आहेत. अशातच आता या तीन लॉकडाउनमध्ये अकोला शहर वाहतूक वभागाने मुजोर अकोलेकरांना चांगलाच धडा शिकविला आहे. या दरम्यान तब्बल दीड हजार वाहने जप्त केली असून, पंधरा हजार वाहनांवेर दंडात्मक कारवाई केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व संक्रमण कमी व्हावे म्हणून सरकारने २४ मार्चपासून लॉकडाउनची घोषणा करून अत्यावश्यक सेवा सोडून संपूर्ण लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपीविली होती. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले होते. लॉकडाउनच्या जवळपास ५० दिवसांच्या काळाते अकोला पोलिस सतत अकोलेकर यांना अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत होते.

लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी शहर वाहतूक शाखेला दिले होते. त्याची कडक अमलबाजवणी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे सहकारी सतत कार्यरत होते. या काळात शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करून कागदपत्र जवळ न बाळगणाऱ्या व विनाकारण वाजवी कारणा शिवाय फिरणाऱ्या १५ हजार पेक्षा जास्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला. तर दीड हजारापेक्षा जास्त वाहने तात्पुरती जप्त करण्यात येऊन सात दिवसानंतर सोडण्यात आली तर एक पेक्षा जास्त वेळ डेटेंड केलेली वाहने लॉकडाउन संपेपर्यंत शहर वाहतूक शाखेत डेटेंड करून ठेवण्यात आली.

वाहनांवर दंडात्मक कारवाई करतांना व तात्पुरती जप्त केलेली वाहने सोडतांना अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर न पडण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन शेळके व वाहतूक कर्मचारी वाहनधारकांना करीत होते, पण या आवाहनाला प्रतिसाद न देता मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत असल्याने अकोला शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, आपल्या वाहनांचे कागदपत्र तसेच परवाने जवळ बाळगावे एकदा डेटेंड केलेले वाहन सात दिवस सोडण्यात येणार नाही तसेच ही वाहने लॉकडाउन संपेपर्यंतसुद्धा अडकवून ठेवण्यात येऊ शकतात तरी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे. 

 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

बुलडाणा जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

वाशीम जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Police taught Muzor vehicle owners a lesson!, Action on fifteen thousand vehicles carried out in lockdown three