esakal | पोलिस कामावर, कोरोना दारावर, अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांवर कोरोनाचे सावट
sakal

बोलून बातमी शोधा

akola police at work, corona at the door, corona at police working day and night

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पोलिस अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत सुद्धा करत आहेत. याच दरम्यान जिल्हा पोलिस दलातील एक पोलिस अधिकारी पॉझिटिव्ह आढळल्याने इतर पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कन्टेटमेंट झोनमध्ये काम करणाऱ्या पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी जोर पकडत आहे.

पोलिस कामावर, कोरोना दारावर, अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांवर कोरोनाचे सावट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पोलिस अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत सुद्धा करत आहेत. याच दरम्यान जिल्हा पोलिस दलातील एक पोलिस अधिकारी पॉझिटिव्ह आढळल्याने इतर पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कन्टेटमेंट झोनमध्ये काम करणाऱ्या पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी जोर पकडत आहे.

कोरोना विरुद्ध आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी त्याचप्रमाणे पोलिस फ्रंट लाईनवर लढत आहेत. परंतु या योद्धांमध्येच कारोना संसर्ग वाढत असून, त्यात पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. कारोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात एक हजार पेक्षा जास्त पोलिसांना कारोनाची लागण झाली असून सात पोलिसांचा कारोनामुळे मृत्यू सुद्धा झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

अकोला पोलिस दलातील एक पोलिस अधिकारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे ड्युटीवर तैनात इतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या क्षेत्रांमध्ये ड्युटी करणाऱ्या इतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची कोरोना चाचणी करण्याची मागणी होत आहे.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती
जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २३ पोलिस स्टेशन कार्यरत आहेत. या पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी, अधिकारी गत दीड महिन्यांपासून सतत सेवा देत आहेत. या पोलिसांना अद्याप एकही सुट्टी देण्यात आली नसून पोलिसांच्या कामाचे तास सुद्धा वाढवण्यात आलेले आहेत. परिणामी वय अधिक असलेल्या पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना मानसिक ताण तणावाचा सामना करावा लागत आहे.

कोरोना चाचणीला ‘खो’
एकीकडे राज्यात एक हजार पोलिस कर्मचारी, अधिकारी कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. महानगरात सुद्धा एक पोलिस अधिकारी पॉझिटिव आढळला आहे. असे असले तरी कंटेंटमेंट झोनसह वर्दळीच्या ठिकाणी कार्यरत पोळी अधिकारी-कर्मचाऱ्यांची अद्याप कोरोना तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

loading image
go to top