esakal | पॉझिटिव्ह अहवालांची त्रीशतकाकडे वाटचाल, दहा पुरुषांसह सात महिला पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

akola Positive reports on the way to the thirtieth, seven women positive, including ten men

अकोल्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे अशातच मंगळवारी प्राप्त झालेल्या एकूण दोनशे अहवालापैकी 17 अहवाल पॉझिटिव आले असून उर्वरित 183 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह अहवालांची त्रीशतकाकडे वाटचाल, दहा पुरुषांसह सात महिला पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : अकोल्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे अशातच मंगळवारी प्राप्त झालेल्या एकूण दोनशे अहवालापैकी 17 अहवाल पॉझिटिव आले असून उर्वरित 183 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून मंगळवारी प्राप्त झालेल्या माहितीनुसार सकाळी प्राप्त झालेल्या 200 अहवालात पैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर उर्वरित 183 अहवाल निगेटिव्ह आली आहेत.


रविवारी प्राप्त झालेल्या पॉझिटीव्ह अहवालांपैकी १० पुरुष आणि सात महिला आहेत. तर त्यातील चार जण हे भीम चौक अकोट फैल येथील तर अन्य सोनटक्के प्लॉट जुने शहर,  सिंधी कॅम्प,  मुजप्फरनगर लकडगंज,  आंबेडकरनगर बसस्टॅंड मागे,  फिरदौस कॉलनी,  दगडी पूल, बैदपूरा,  आदर्श कॉलनी सिंधी कॅम्प,  अकोली बुद्रुक गीतानगर जुनेशहर,  हाजीनगर अकोट फैल, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट,मोमीनपुरा ताजनापेठ, रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत.

23 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
सोमवारी रात्री आणखी २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  हे सर्व जण संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. यातील  आठ  जण खैर मोहम्म्द प्लॉट येथील तर तीन जण आंबेडकर नगर, तीन जण रामनगर सिव्हील लाईन्स येथील तर उर्वरीत  ओल्ड आळशी प्लॉट,  माळीपुरा,  फिरदौस कॉलनी,  गोकुळ कॉलनी,  तारफैल, भीमनगर,  सराफा बाजार, जुनी शहर पोलीस चौकी, अकोट फैल  या भागातील रहिवासी आहेत.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२७८
मयत-१८(१७+१),डिस्चार्ज-१४४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११६

पॉझिटिव्ह अहवालांची त्रीशतकाकडे वाटचाल
एप्रिल महिन्यात अगदी तुटपुंजी रुग्णसंख्या असलेल्या अकोला शहरात मे महिन्यात कोरोना चा उद्रेक होताना दिसत आहे सद्यस्थितीत पॉझिटिव्ह अहवाल येण्याची संख्या 278 झाली असून काही दिवसातच हा आकडा 300 पार होणार आहे यातच उपचार घेत असलेले रुग्ण आणि डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या हे भक्कम असल्याचे दिसून येत आहे
 

loading image
go to top