पून्हा जनता कर्फ्यू : उद्या परवा संपूर्ण लॉकडाउन, लॉकडाऊन कालावधीत ३१ मेपर्यंत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील लॉकडाउन कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ केली आहे. त्यानुसार लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे.

 

अकोला  : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील लॉकडाउन कालावधीत ३१ मे पर्यंत वाढ केली आहे. त्यानुसार  लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने १७ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता. परंतु त्यानंतर सुद्धा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ३१ मेपर्यंत टाळेबंदी कायम राहील. त्याची जिल्ह्यात सुद्धा अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत १९ व २० मे रोजी जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या संचासरबंदीतून अकोट या उपविभागास वगळण्यात आले आहे. उर्वरित लॉकडाउन कालावधित जीवनावश्यक सेवा व ज्यांना लॉकडाउनमधून सुट देण्यात आली आहे. त्याबाबी मात्र सकाळी ६ ते दुपारी १ या कालावधीतच सुरू ठेवता येणार आहेत. लॉकडाउनमधून कृषी व कृषी संबंधित सेवा संपूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत.

बॅंकांनीही नियमित वेळेत कामकाज करण्याची परवानगी देण्यात आली असून, या काळात पीक कर्ज वाटपाचे काम पूर्ण करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. जेथे-जेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत तेथील निर्बंध मात्र पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
 

जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या कालावधीत मंगळवार (ता. १९ व बुधवार (ता. २०) दोन दिवस संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
बुलडाणा जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
वाशीम जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Public curfew again: Lockdown period extended till May 31