दिशाभूल : रेडझोन ऑरेंजझोनमध्ये तफावत, कमी कोरोनाबाधित जिल्हा रेड झोनमध्ये तर जास्त बाधित अन् मृत्यू असलेला जिल्हा ऑरेंज झोनमध्ये कसा?

विवेक मेतकर
Saturday, 2 May 2020

कोला रेड झोनमध्ये आहे. मात्र, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात जास्त केसेस असताना ते रेडझोनमध्ये न टाकता, ऑरेंजमध्ये टाकणे हा नेमका गोंधळ काय आहे याचा तातडीने खुलासा होणे गरजेचे आहे. झोनिंगचे निकष व त्याची प्रक्रिया जनहितार्थ जाहिर करून या झोनिंगमधली तफावत का आली याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी

 

अकोला : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त जिल्हाचे झोनिंग दिशाभूल करणारे असून जास्त बाधित व मृत संख्या असलेला जिल्हा ऑरेंज तर कमी बाधित व कमी मृत्यू असलेला जिल्हा रेड झोनमध्ये दिसत असल्याने नागरिक गोंधळात असून आरोग्य विभाग प्रशासनाने या तफावतीचा नेमका खुलासा करावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. 

हेही वाचा - अकोला सर्वाधिक हॉट

अकोला मध्ये ३२ जण कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले. त्यात चार जण मृत्यू पावले तर ११ जणांना घरी सोडले असून १७ जण उपचार घेत आहेत. त्यातुलनेत अमरावती जिल्ह्यातील कोरोना पॉजिटिव ४३ असून ७ जण मृत्यू पावले आहेत.अशी आकडेवारी असताना कमी बाधित व कमी मृत्यू दर असलेला अकोला जिल्हा रेड झोनमध्ये तर जास्त बाधित व जास्त मृत्यू दर असलेला अमरावती जिल्हा ऑरेंज झोनमध्ये दाखविला जात आहे. अकोलापेक्षा जास्त रूग्ण बुलडाणा जिल्ह्यात आहेत. तरीही तो जिल्हा देखील ऑरेंज झोनमध्ये दिसतो. चंद्रपुरात एकही रुग्ण नसताना तो जिल्हा देखील ऑरेंज झोनमध्ये दाखविला आहे.

हेही वाचा - त्यांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा मी राजकीय सन्यास घेईल!, कोण म्हणाले पहा 

अकोला रेड झोनमध्ये आहे. मात्र, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यात जास्त केसेस असताना ते रेडझोनमध्ये न टाकता, ऑरेंजमध्ये टाकणे हा नेमका गोंधळ काय आहे याचा तातडीने खुलासा होणे गरजेचे आहे. झोनिंगचे निकष व त्याची प्रक्रिया जनहितार्थ जाहिर करून या झोनिंगमधली तफावत का आली याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशीही मागणी वंचित बहूजन आघाडीने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola in red zone or buldana, amravati orange zone, how its possible?