शहरातील कन्टेंमेन्ट झोनची पंच्याहत्तरी, रोज नवीन क्षेत्राची भर, कोरोना संसर्गात होणारी वाढ काळजी वाढविणारी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या ४०० च्या घरात पोहोचली आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंता वाढवणारी असून, हे रुग्ण दररोज शहरातील नवीन परिसरातील असल्याने आतापर्यंत ७६ परिसर कन्टेंमेन्ट झोन म्हणून सील करण्यात आले आहे.

अकोला  : महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या ४०० च्या घरात पोहोचली आहे. वाढणारी रुग्ण संख्या चिंता वाढवणारी असून, हे रुग्ण दररोज शहरातील नवीन परिसरातील असल्याने आतापर्यंत ७६ परिसर कन्टेंमेन्ट झोन म्हणून सील करण्यात आले आहे.

अकोला महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४०० च्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. त्यापेक्षाही अधिक चिंता वाढविणारी बाब म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रात होत असलेली वाढ आहे. आतापर्यंत काही मर्यादित क्षेत्रापुरता मर्यादित असलेला संसर्ग आता शहराच्या मध्यवर्ती भागासह सीमावर्ती भागातील वस्तांमध्येही पोहोचला आहे. त्यासोबतच उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे दररोज नवीन प्रतिबंधित क्षेत्राची भर पडत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत अकोला शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या ७६ झाली होती.

संपूर्ण शहरातच पसरतोय कोरोना हातपाय
अकोला शहराच्या चारही दिशांना कोरोना बांधित रुग्ण आढळू लागले आहेत. आतापर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वस्तीत हातपाय पसरत असलेला कोरोना आधी सिंधी कॅम्प व तेथून कृषिनगरात पोहोचला. त्यानंतर जणूकाही कोरोना विषाणू सैराट झाला असून, शहराच्या चारही दिशेने असेल्या वस्त्या त्याने कवेत घेतल्या आहेत. हळूहळू संपूर्ण शहराचा ताबा कोरोना घेतो की काय, अशी भिती व्यक्त होऊ लागली आहे.

हे परिसर केलेत सिल
बैदपुरा, अकोटफैल, सिंधी कॅम्प, कृषिनगर, खैर मोहम्मद प्लॉट, मेहरेनगर डाबकीरोड, कमलानगर वाशीम बायपास, रवीनगर सुधीर कॉलनी, शिवर, शिवनी, जयहिंद चौक, शंकरनगर अकोटफैल, गुलजारपुरा आरपीटीएस रोड, न्यू राधाकिसना प्लॉट, माळीपुरा, अगरवेस राजपुरा, आळशी प्लॉट, तारफैल, अक्कलकोट हरिहरपेठ, बापूनगर, रामनगर म्हाडा कॉलनी, गडंकी आरपीटीएसरोड, भवानीपेठ तारफैल, आझाद कॉलनी, आंबेडकरनगर सिव्हिल लाईन्स, मोठी उमरी, तकीया अगरबेस, खिडकीपुरा जुने शहर, खडकी, जीएमसी क्वॉटर गौरक्षण रोड, शास्त्रीनगर, पोलिस क्वॉटर रामदासपेठ, अंसार कॉलनी, राजपुतपुरा, नायगाव, लक्कडगंज रोड, आनंदनगर दमानी हॉस्पिटल, सावंतवाडी रणपिसेनगर, डाबकी व्हिलेज डाबकी रोड, गीतानगर जुनेशहर, रेल्वे क्वॉटर जठारपेठ, संतोषी माता चौक मालधक्का रोड, आदर्श कॉलनी, कच्ची खोली सिंधी कॅम्प, सोनटक्के प्लॉट जुने शहर, अकोली गाव गीतानगर जुने शहर, सावतराम मिल दगडी पूल, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट, लोरिया कम्पाऊंड खोलेश्वर, नानकनगर निमवाडी, खेताननगर कौलखेड, गुलजारपुरा रिव्हर साईड, जागृती विद्यालय रणपिसेनगर, देसमुख फैल, न्यू तारफैल, चरिणीया कम्पाऊंड लक्कडगंज रोड, मोहता मील रोड, व्हीएचबी कॉलनी गोरक्षण रोड, ज्योदी नगर जठारपेठ, सोनटक्के प्लॉट-२ जुने शहर, जोघळेकर प्लॉट, महोदव मंदीर गोकूळ कॉलनी, गायत्रीनगर, लक्ष्मीनगर, पार्वतीनगर, दसेरानगर हरिहरपेठ, हमजा प्लॉट, मलकापूर चौक मेन रोड, आरोग्यधाम कॉलनी मलकापूर, राऊतवाडी, नाईस बेकरी, प्रमोद सॉ मील लक्कडगंज.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Seventy-five of the city's containment zones, new areas added every day, increase in corona infection worries