पुणे, मुंबईत अडकले काळजी करू नका, लवकरच सुरू होणार बस सेवा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

पुणे, मुंबई वर राज्याच्या इतर भागात अडकलेल्या विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचला यावे म्हणून एसटी बस सुविधा देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली असून, 22 प्रवाशी बस सोडणार आहे.

 

अकोला:  पुणे, मुंबई वर राज्याच्या इतर भागात अडकलेल्या विद्यार्थी व नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचला यावे म्हणून एसटी बस सुविधा देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली असून, 22 प्रवाशी बस सोडणार आहे.  

एसटी महामंडळात एक पोर्टेबल तयार करून 22 जणांचा प्रवासी साठी विशेष बसेस सोडण्याची सुविधा महाराष्ट्रात सुरू करणार आहे. 

त्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना त्यांच्या गावी सोडण्यासंदर्भातील निर्देश एसटी महामंडळातर्फे देण्यात आले आहे. विद्यार्थी व नागरिकांसाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी भाजपचे अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली होती. राज्य शासनाने ही मागणी पूर्ण केली असली तरी  विद्यार्थी आणि नागरिकांच्या प्रवाश सवलतीसंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. सलवतीचा निर्णयही लवकरात लवकर घ्यावा, अशी आग्रही मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणावर पुणे परिसरात राहतात. त्यांना अकोल्यात परत येण्यासाठी बसची सुविधा प्राप्त होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola st bus allotted for mumbai and pune student