सरकारी दवाखान्यांमधील ‘रक्त’आटले!, रक्तपेढीत केवळ 39 पिश्व्या रक्तसाठा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट आणि दुसरीकडे आता येथील शावसकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत मागील काही दिवसापासून रक्ताचा तुटवडा असल्याचे चित्र आहे.

अकोला ः एकीकडे कोरोनाचे महाभयंकर संकट आणि दुसरीकडे आता येथील शावसकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत मागील काही दिवसापासून रक्ताचा तुटवडा असल्याचे चित्र आहे.

कारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत अवघ्या ३९ पिशव्या रक्तसाठा असून, ही स्थिती अशीच राहली तर मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.

१६ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या अकोला जिल्ह्यातील नागरिकांसोबतच वऱ्हालडातील वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांवर येथेच उपचार केले जातात. सोबतच काही शस्त्रक्रिया आणि अपघातातील रुग्णांवर उपचार करताना रक्ताची नितांत आवश्यकता असते. मात्र, मागील दोन महिन्यापासून कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली आणि त्याचा परिणाम इतर क्षेत्रासह रुग्णालयांवरही झाला आहे. रक्तदाते रक्तदानासाठी पुढे येत नसल्याने शासकीय रक्तपेढीत केवळ ३९ पिशव्याच रक्तसाठा असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही परिस्थिती अशीच राहली तर मोठी समस्या उदभवू शकते अशीही माहिती आहे.

असा आहे सध्या रक्तसाठा रक्त गट संख्या
ओ + 28
ओ - 00
ए + 03
ए - 00
बी + 07
बी - 00
एबी + 01
एबी - 00

इतर रक्त गटाच्या ३६ पिशव्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत३९ पिशव्या रक्तसाठा असून, इतर रक्तगटाच्या ३६ पिशव्या आहेत. अशी माहिती शासकीय रक्तपेढीतून प्राप्त झाली आहे. या टाळेबंदीत मेजर शस्त्रक्रिया असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यास मोठी समस्या उदभवू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola There is only blood in government hospitals, only 39 bags of blood in the blood bank