कोरोनाच्या सावटाखालील अशीही,'एका लग्नाची गोष्ट!'

अविनाश बेलाडकर
Wednesday, 15 April 2020

संपूर्ण जग वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूने सर्व व्यवहार ठप्प केले आहेत, मात्र हिंदुस्थानातील 'विवाह संस्थे'ला तो भयंकर विषाणू धक्का लावू शकला नाही, कोरोनाच्या सावटाखालील 'एका लग्नाच्या गोष्टी'ने हे आज या तालुक्यात सिद्ध केले व कोरोना विरोधी लढ्याचा भारतीयांचा निर्धारही जगजाहीर केला.

 

मूर्तिजापूर (जि.अकोला) : संपूर्ण जग वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूने सर्व व्यवहार ठप्प केले आहेत, मात्र हिंदुस्थानातील 'विवाह संस्थे'ला तो भयंकर विषाणू धक्का लावू शकला नाही, कोरोनाच्या सावटाखालील 'एका लग्नाच्या गोष्टी'ने हे आज या तालुक्यात सिद्ध केले व कोरोना विरोधी लढ्याचा भारतीयांचा निर्धारही जगजाहीर केला.

या तालुक्यातील गाझीपूरचे दिलीप तायडे यांची मुलगी अंकिताचा वांःडनिश्चय अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील कळासीचे किसनराव वानखडे यांच्या अंकुश नावाच्या मुलाशी कोरोनाची चाहूल जगाला लागण्यापूर्वीच झाला होता. तेव्हाच आज (ता.१५) ला १२.२२ वाजताचा विवाह मुहूर्तही ठरला होता. मुहुर्ताची घटिका भरण्यापूर्वीच कोरोनाचे आक्रमण झाले. पंतप्रधानांनी लावलेला लॉकडाऊन संपल्यानंतर आपला विवाह मुहुर्त आहे, असे मानून वर-वधू पिता निर्धास्त होते.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

पंतप्रधानांनी घोषणा केली अन् लॉकडाऊन ३ एप्रिल पर्यंत वाढला. लगेच वरपित्याने ग्रामास्तरीय कोरोना समितीच्या माध्यमातून  प्रशासनाशी संपर्क साधला. तलाठी संदीप बोळे यांनी उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व तहसीलदार प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शत वधुपित्याला सूचना दिल्या,'विवाह संपन्न करा. गर्दी करू नका. वऱ्हाड बोलावू नका. शेजारच्या मंडळींनाही निमंत्रीत करू नका.' असाच निरोप वधुपित्याने वरपित्याला दिला. 
          

Image may contain: one or more people, people sitting, people standing, motorcycle and outdoor

आज सकाळीच दोन दुचाकी घेऊन नवरदेव अंकूश आपले काका व चुलत भावासमवेत गाझीपुरला पोचले. मुलीचे आई, वडील व भाऊ यांच्यासह तलाठी संदीप बोळे, सरंपच स्वप्निल तवर, पोलीस पाटील विजय भावाने व कोतवाल सुनिल तायडे यांच्या उपस्थितीत विधीवत ८ वाजताच विवाह पार पडला. महसूल प्रशासनाकडून एक सॕनिटायझर व रोख ५०० रुपये तसेच सरपंच स्वप्निल तवर यांच्याकडून ५०० रूपये विवाह भेट नवदाम्पत्याला देण्यात आली. इला त्याच दुचाकीवरून नवरदेव नवरीला गाझीपूरहून कळाशीला घेऊन गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola wedding story at murtizapur