डॉक्टरसह आणखी सहा पॉझिटिव्ह, अकोल्यात वाढला कोरोनाचा धोका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सलग पाचव्या दिवशी त्यात आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

अकोला ः मागील काही दिवसांपासून अकोल्यात कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. अशातच शनिवारी (ता.2) पुन्हा सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका डॉक्टरांचाही समावेश असल्याने आता अकोलेकरांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे. 

 शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सलग पाचव्या दिवशी त्यात आणखी सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यातील पाच रुग्ण हे बैदपुरा येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या संपर्कातील असून, त्यामध्ये एका खासगी डॉक्टरसह त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर एक रुग्ण हा मोहम्मद अली रोड येथील रहिवासी आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान 79 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता मृतांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या पाचवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 38 वर पोहोचला असला, तरी प्रत्यक्षात मात्र २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरीत 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

अशी आहे आतापर्यंतची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 38
उपचार सुरू असलेले     - 22
आत्महत्या                     -1
मृत्यू                                -4


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola's corona threat increased

Tags
टॉपिकस
Topic Tags: