पोलिसाला जायचे होते कोरोना वार्डात, तेव्हाच वार्डाचे सुरक्षा रक्षक आले आडवे अन् चांगलीच...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

रामदासपेठ पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी कोरोना बाधित म्हणून जीएमसीतील आयसोलेशन कक्षात दाखल आहे. या कर्मचाऱ्याला एक पोलिस कर्मचारी शनिवारी भेटायला आला. हा पोलिस कर्मचारी विना सुरक्षा आयसोलेशन कक्षात जात होता.

अकोला : आधीच कोरोनाचा उद्रेक आणि दुसरीकडे रुग्णांचे नातेवाईक आयसोलेशन वॉर्डमध्ये जाण्यासाठी सुरक्षा रक्षकांसोबत वाद घालित आहेत. असाच प्रकार शनिवारी (ता.23) गर्व्हमेंट मेडिकल काॅलेजमध्ये घडला. यावेळी सुरक्षा रक्षक आणि नातेवाईक पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये हमरी-तुमरी झाली, मात्र, काही वेळेनंतर हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विना सुरक्षा गर्व्हमेंट मेडिकल काॅलेजमध्ये आयसोलेशन कक्षात जाणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास सुरक्षारक्षकाने हटकले असता त्यांच्यात वाद झाला. हा प्रकार अधिष्ठाता कार्यालयात पोहोचल्यावर प्रकरण आपसात घेण्यात आले.

हेही वाचा - अरेरे! मोफत मिळतोय तांदुळ तरी होतोय गैरप्रकार; त्या तांदुळाच्या बदल्यात...

प्राप्त माहितीनुसार, रामदासपेठ पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी कोरोना बाधित म्हणून जीएमसीतील आयसोलेशन कक्षात दाखल आहे. या कर्मचाऱ्याला एक पोलिस कर्मचारी शनिवारी भेटायला आला. हा पोलिस कर्मचारी विना सुरक्षा आयसोलेशन कक्षात जात होता. हा प्रकार निदर्शनास येताच येथील सुरक्षारक्षकाने त्यांना हटकले. 

यावरून पोलिस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात वाद झाला. या वादामुळे जीएमसी परिसरात चांगलीच गर्दी जमली होती. दरम्यान अधिष्ठाता डॉक्टर घोरपडे यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण आपसात मिटवण्यात आले.

पाॅझिटिव्ह अहवालांची संख्या पोहोचली 387 वर; एकाचा मृत्यू
अकोल्यात रविवारी प्राप्त झालेल्या एकूण 169 अहवाल पैकी नऊ जण पुन्हा पॉझिटिव्ह आढळले आहेत आता अकोला येथे पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या 387 वर जाऊन पोहोचली आहे. तर अकोल्यात पुन्हा एका जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी एकूण 169 अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये नऊ अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून यामध्ये चार महिला तर पाच पुरुषांचा समावेश आहे विशेष म्हणजे पाच जर हे तेल्हारा तालुक्यातील असल्याने आता तेलारा तालुका वासियांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argument between police and security guards after going to Corona ward