'कोई रोड पर ना निकले'च्या पेंटिंग मधून इथे होतेय जनजागृती

शुभम बायस्कार
गुरुवार, 26 मार्च 2020

जगभरात कोरोनाची दहशत पसरल्याने संचार बंदी  लागू करण्यात आली. 'कोई रोड पर ना निकले' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर दिसत असल्याने अकोल्यातील तथागत नगर येथील राहुल ससाने याने शहरातील चौकचौकात जावून कोरोनाची जनजागृती सुरु केली आहे.

 

अकोला ::  जगभरात कोरोनाची दहशत पसरल्याने संचार बंदी  लागू करण्यात आली. 'कोई रोड पर ना निकले' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर दिसत असल्याने अकोल्यातील तथागत नगर येथील राहुल ससाने याने शहरातील चौकचौकात जावून कोरोनाची जनजागृती सुरु केली आहे.

 स्वताला देशभक्त म्हणून घेणारे संचार बंदीचे उल्लंघन करणारे शेकडो नागरिक सध्या दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन केल्यानंतरही शेकडो नागरिक गरज नसताना अद्यापही रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी सजग राहून घरातच राहण्याची गरज आहे. पण काही नागरिक त्याला अपवाद ठरत असल्याने अकोल्याच्या तथागत नगरातील राहुल ससाने याने शहरातील मुख्य चौकाचौकांमध्ये जाऊन 'कोई रोड पर ना निकले' अशी पेंटिंग काढून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राहुल सांगतो,  सध्या देशात पर्यायाने जगात कोरोनामुळे जागतिक महामारीची स्थिती निर्माण झाली आहे. या संकटाला पळून लावण्यासाठी कोरोनाची चैन तोडण्याचे  आपल्या सगळ्यांसमोर आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून घरातच राहण्याची नितांत आवश्यकता आहे. पण काही नागरिक रस्त्यावर दिसत असल्याने  पेंटिंग करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे तो नम्रपणे सांगतो. 

आरडीसी कडून कौतुक 
गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास राहुल ससाने याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील चौकात पेंटिंग रेखाटायला सुरुवात केली. बघता बघता अतिशय सुरेख दोन पेंटिंग त्याने या चौकात रेखाटल्या. त्याच्या या उपक्रमाची दखल थेट उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी घेतली. राहुलला भेटून त्यांनी त्याचे अभिनंदन केले व त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness from paintings at akola