esakal | Video: बुलडाणा जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी, आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

 buldana corona posittive got negative report marathi news

पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असताना बुलढाणेकरांसाठी मात्र गेल्या काही दिवसात दिलासादायक बातम्यांचा  काळ सुरू झाला आहे. सुरुवातीला तीन त्यानंतर पाच व आज पुन्हा तीन कोरोनाग्रस्तांना आजारातून मुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

Video: बुलडाणा जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी, आणखी तीन रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडणा : पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असताना बुलढाणेकरांसाठी मात्र गेल्या काही दिवसात दिलासादायक बातम्यांचा  काळ सुरू झाला आहे. सुरुवातीला तीन त्यानंतर पाच व आज पुन्हा तीन कोरोनाग्रस्तांना आजारातून मुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. 


बुलडाणा येथील महिला सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल असलेल्या बारा पैकी आणखी तिघांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात  आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी त्यांना कोरोना मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर रुग्णांची जीवघेण्या आजारातून मुक्त झाल्याबद्दल टाळ्या वाजवून स्वागत केले. हसतमुखाने त्यांना निरोप दिला. आगामी काळात काय काळजी घ्यायची या संदर्भात देखील डॉ. पंडित यांनी या रुग्णांना मार्गदर्शन केले. 

विशेष म्हणजे खामगाव आणि शेगाव तालुक्यातील रुग्णांचा यात समावेश असल्याने हे दोन्ही तालुके कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. यापूर्वीच 17 एप्रिलला तीन व 20 एप्रिल रोजी पाच जणांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आयसोलेशन कक्षातील रुग्णांची संख्या नऊ राहणार आहे. 
आज सुट्टी झालेल्यामध्ये एका पाच वर्षीय मुलाचा समावेश आहे.